मायणीत पावसामुळे हाहाकार - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, September 25, 2024

मायणीत पावसामुळे हाहाकार

मायणी दि.२५ :- प्रतिनिधी तानाजी चव्हाण 
मायणी येथे आज बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र एकच हाहाकार उडाला असून मल्हारपेठ - पंढरपूर महामार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने सर्वत्र वाहतूक खोळंबली होती. तसेच अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेले चार दिवस मायणी व परिसरात पावसाचा जोर पहावयास मिळाला आहे. आजच्या पावसाचा जोर अधिकच असल्याने मायणी येथील मल्हारपेठ - पंढरपूर महामार्ग,मायणी - मोराळे,मायणी -प्राथमिक आरोग्य केंद्र,मायणी- लक्ष्मीनगर,मायणी - शेडगेवाडी असे विविध रस्ते ठिकठिकाणी ओढ्याच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेले. तसेच भूमापक कार्यालय परिसर,पोलीस दुरक्षेत्र परिसरातील काही घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांची धांदल उडाली होती. त्याठिकाणच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तू,अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. 
तसेच पावसाचे पाणी शेतीत साचल्याने अनेक ठिकाणी बांध फुटून ठिकठिकाणी शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्याचे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक कोंडीत सापडला आहे.

No comments:

Post a Comment