पोलीस भरती व शेअर्सच्या अमिषाने 80 लाखांची फसवणूक - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, December 26, 2024

पोलीस भरती व शेअर्सच्या अमिषाने 80 लाखांची फसवणूक


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड:
पोलीस भरती/क्लार्क म्हणून नोकरी लावतो, तसेच शेअर मार्केटमध्ये जास्तीचे पैसे काढून देण्याचे अमिष दाखवून 11 जणांची  80 लाखांची फसवणूक करणार्‍या भामट्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत विलास पवार (रा. जत, जि. सांगली, हल्ली रा. फ्लॅट नं. 10, त्रिमुर्ती अपार्टमेंट, एम्पायर हिल, कोयना वसाहत कराड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
प्रणव रमेश जगताप (वय 24, रा. फ्लॅट नं. 105, शिवराय अपार्टमेंट, एम्पायर हिल, कोयना वसाहत, मलकापूर) यांनी फिर्याद दिली.
जगताप यांना पवारने मी आयपीएस अधिकारी असे भासवून त्याच्याकडील आयपीएस लिहिलेले व राजमुद्रा असलेले जर्कीन व टोपी व इतर कपडे परिधान करून त्याने भरतीचे अमिष दाखवून जगताप यांच्याकडून 39 लाख 99 हजार 282 रुपये घेतले. त्यानंतरही त्याने नोकरी न लावता त्या बदल्यात बनावट मेलआयडी तयार करून त्यावर राजपत्रीत बनावट नियुक्तीपत्र तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या अधिकार्‍यांच्या सहीचे बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केली. तसेच पवारने अशाच प्रकारे शाहरूख मोहंमद शेख (रा. कोयना वसाहत कराड यांच्यासह अन्य 10 जणांची फसवणूक केली. फिर्यादीसह सर्वांकडून त्याने 79 लाख 59 हजार 782 रुपये उकळले व सर्वांना बनावट नियुक्तीपत्रे देत फसवणूक केली. दि. 1 जून 2023 ते 25 डिसेंबर 2024 या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक   निरीक्षक माळी करत आहेत.

No comments:

Post a Comment