कुरवलीत भरदुपारी युवक-युवतीला जबरदस्तीने लुटले - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, December 8, 2024

कुरवलीत भरदुपारी युवक-युवतीला जबरदस्तीने लुटले

सत्य सह्याद्री/कोळकी
कुरवली, ता. फलटण येथे कुरवली धरण परिसरात मैत्रिणीसोबत फिरायला आलेल्या युवकाला दगडाने मारहाण करून चाकूचा धाक दाखवून दोघा अज्ञातांनी अडीच लाखांची लूट केली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी विजय संपत घाडगे (वय 20, रा. बिरदेव नगर, फलटण) याने फिर्याद दिली. शुक्रवारी दि. 6 रोजी विजय त्याच्या मैत्रीणीसोबत वाढदिवस असल्याने धरण परिसरात फिरायला गेले होते. दुपारी 1 च्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच दगडांनी मारहाण करून विजयकडील सोन्याचे दागिने, मोबाईल असा 2 लाख 50 हजार 900 रुपयांचा ऐवज लुटून नेला.
घटनास्थळी उपअधीक्षक राहूल धस यांनी भेट दिली. तपास उपनिरीक्षक बदने करत आहेत.

No comments:

Post a Comment