मेघा इंजिनिअरींग कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, December 8, 2024

मेघा इंजिनिअरींग कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

सत्य सह्याद्री/कोरेगाव
खड्ड्याच्या बाजूला सुरक्षा कठडे, बॅरिगेट्स, संरक्षक फलक अशी उपाययोजना न केल्याने खड्ड्यात पडून भाऊ बाळासाहेब महाडिक (वय 56, रा. शिवाजीनगर कोरेगाव) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा-लातूर महामार्गाचे काम घेतलेली ठेकेदार कंपनी मेघा इंजिनिअरींग वर्कस, त्याचा ठेकेदार, कंपनीचे संचालक व कामावरील डीजीएम मुकादम महेंद्र (पूर्ण नाव, गाव माहित नाही) अशा चौघांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. मृताचे बंधू रामचंद्र शिवाजी महाडिक (वय 47) यांनी फिर्याद दिली. दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पुसेगाव रस्त्या लगत सरस्तवी मेडिकल व बांधकाम सुरु असलेल्या पोरे यांच्या कमारतीच्या समोरून जाणार्‍या कोरेगाव-पुसेगाव रस्त्याच्या उजव्या बाजूस गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बाळासाहेब यांचा मृत्यू झाला होता. तपास पोलीस निरीक्षक बल्लाळ करत आहेत.

No comments:

Post a Comment