फलटणमध्ये मेसचालकावर कोयत्याने वार, तिघांवर गुन्हा - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, December 8, 2024

फलटणमध्ये मेसचालकावर कोयत्याने वार, तिघांवर गुन्हा

सत्य सह्याद्री/कोळकी
सगुणामातानगर मलटण, फलटण येथील मेसचालकावर जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. जिंती नाका येथील रुपाली चायनीज दुकानासमोर दि. 6 रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. मयूर मारुती कुंभार (वय 30, रा. सगुणामातानगर) यांनी फिर्याद दिली. रोहित नटराज पवार (वय 25), राहूल नटराज पवार (वय 26, दोघे रा. गोसावी गल्ली, जिंती नाका, मलठण) व एक अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मयूर जिंती नाक्यावर मित्र रोहित गानबोटे सोबत चर्चा करत असताना दुचाकीवरून आले व लोखंडी कोयत्याने वार करून पाठीवर व डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment