Hot Posts

6/recent/ticker-posts

झेडपीत आंदोलन, तुषार मोतलिंग यांच्यावर गुन्हा

 

सत्य सह्याद्री/सातारा

अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे बोर्ड घेऊन जिल्हा परिषदेतील सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी  तुषार मोतलिंग यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याप्रकरणी सातारा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक अधिकारी धनंजय कदम यांनी फिर्याद दिली. 

दि. १४ रोजी मोतलिंग हे झेडपीतील चौथ्या मजल्यावरील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कायार्लयाच्या दरवाजाजवळ बसून नीलेश घुले व जितेंद्र देसाई यांच्याबद्दल अपशब्द लिहिलेले फलक घेऊन तेथे बसले होते.  यातून शासकीय कामात अटकाव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांची बदनामी केली तसेच कदम यांच्याव काम करु नये यासाठी दबाव आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments