क्षेत्र महाबळेश्वर
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शेखर कदम
ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या क्षेत्र महाबळेश्वर येथे शारदीय नवरात्रोत्सव अत्यंत भक्तीमय आणि पारंपरिक वातावरणात साजरा केला जात आहे. शतकानुशतके चालत आलेल्या धार्मिक रुढी आणि परंपरांचे जतन करत येथील प्रसिद्ध श्री कुंभळजाई देवी मंदिर आणि श्री महाबळेश्वर मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने आणि जयघोषाने दुमदुमून गेला आहे.
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दोन्ही मंदिरांमध्ये देवांना अतिशय सुंदर आणि नयनरम्य पोशाख परिधान करण्यात आला आहे. देवीची मूर्ती पारंपरिक अलंकारांनी आणि सुबक वस्त्रांनी सजवण्यात आली असून, तिचे हे रूप भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरत आहे. गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक फुलांची आणि विद्युत रोषणाईची सजावट मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहे.उत्सवाच्या काळात महाबळेश्वर आणि परिसरातील हजारो ग्रामस्थ तसेच दुरून येणारे पर्यटक देवाच्या या देखण्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात हजेरी लावत आहेत. क्षेत्र महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात भक्ती आणि मांगल्याचा हा अनोखा सोहळा संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण करत आहे.

0 Comments