जाहीर दिलगीरी - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, July 31, 2018

जाहीर दिलगीरी

दैनिक सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

या महिन्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाचा मोठा फटका दैनिक सत्य सह्याद्रीच्या वितरणाला बसला आहे. दैनिक सत्य सह्याद्रीची छपाई सोलापूर येथे होत असून आंदोलनामुळे एस. टी. सेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे या महिन्यात दोन वेळा छपाई होऊनही अंक वाचकांपर्यंत पोहोचू शकला नाही. दरम्यान, आजही सोलापूर जिल्हा बंद असल्याने मंगळवार दि. 31 रोजीचा अंक प्रकाशित होणार नाही. शिवाय मंगळवारी कार्यालयास सुटी असल्याने बुधवार दि. 1 ऑगस्टचा अंकही प्रकाशित होऊ शकणार नाही. त्यामुळे होणार असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.

No comments:

Post a Comment