वाळू तस्करांकडून महसूल कर्मचार्‍यांना मारहाण, जीवे मारण्याची धमकी, तळबीडला सहाजणांविरोधात गुन्हा - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, July 30, 2018

वाळू तस्करांकडून महसूल कर्मचार्‍यांना मारहाण, जीवे मारण्याची धमकी, तळबीडला सहाजणांविरोधात गुन्हा



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
उंब्रज: अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपर चालकासह अन्य सहा जणांनी कराड महसूल विभागाच्या गौन खनिजचे अव्वल कारकून यांना मारहाण दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तळबीड पोलिसांत अज्ञात सहा जणांनावर गुन्हा दाखल झाला आहे. वहागाव (ता. कराड) हद्दीत सोमवारी सकाळी ही घटना घडली. दरम्यान,  महसूल कर्मचार्‍यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यात काम बंद आंदोलन सुरू केले आहे. संबंधितावर मोकाअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत कराड तहसीलदार कार्यालयाचे संकलन विभाग येथील लिपीक संतोष कृष्णराव गुल्हाने रा. सदर बाजार सातारा यांनी तळबीड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
गुल्हाने सोमवार दि. 30 रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सॅन्ट्रो कार क्रमांक एम. एच. 12 इ. जी. 6846 ने सातारा हून कराडकडे निघाले होते. त्यांच्या सोबत कराड तहसील कार्यालयातील अव्वल कारकून मकरंद काशीनाथ साळुंखे (रा. सदर बाजार सातारा) हे होते. त्यावेळी महामार्गावरील इंदोली फाटा येथे पोचल्यानंतर 10 वाजण्याच्या सुमारास कराड बाजूला वाळू वाहतूक करणारा डंपर (क्रमांक एमएच 50 2155) हा दिसला त्यावेळी संतोष गुल्हाने व मकरंद साळुंखे यांनी सदरचा डंपर थांबवला व ओळखपत्र दाखवून चालकास वाळू कोठून आणलीस अशी विचारणा केली असता चालकांने सदरची वाळू रहिमतपूर येथून आणली असल्याचे सांगून तीन ब्रास वाळूची पावती चालकने दाखवली. परंतु, सदरची वाळू अंदाजे चार ब्रास व नियम बाह्य असल्याचे दिसून आले. गुल्हाने यांनी सदरची माहिती कराडचे तहसीलदार यांना दिली असता तहसीलदार शेळके यांनी सदरचा डंपर कराड येथील तहसीलदार कार्यालयात घेऊन येण्याचे तोंडी आदेश दिले. डंपर चालकास नाव विचारले असता त्याने नांव सांगितले नाही. म्हणून डंपर मधील एका इसमास गुल्हाने यांच्या कार मध्ये घेतले. व डंपर कराडकडे घेऊन जात असताना वहागाव गावच्या हद्दीत भराव पूलावर डंपर थांबवला त्यामुळे गुल्हाने यांनी डंपरचच्या पुढे कार थांबवली त्यावेळी तेथे बुलेट क्रमांक एमएच 50 पी 6067 वरून आलेल्या तिघांनी गाडी सोडा असे सांगितले. त्यावेळी डंपर चालकाने गुल्हाने व साळुंखे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. डंपर महामार्गावरून सेवा रस्तावरून उंब्रज कडे वळला. त्यानंतर डंपरचा पाठलाग केला असता तो तळबीड फाट्यावर दिसून आला. त्यावेळी दोन दुचाकीवरून पाच जण आले तसेच फिर्यादीच्या कारमध्ये बसलेल्या एक अशा सहा जणांनी मारहाण केली खिशातील मोबाईल, फिर्यादीने घेतलेल्या पावत्या गाडीची चावी काढून घेतले व दमदाटी केली तसेच मोबाईल मधील व्हिडिओ चित्रीकरण व फोटो डिलीट करून मारहाण करण्यास सुरुवात केली व दोघांनाही भोसकून टाकू अशी धमकी दिली. याच दरम्यान शासकीय अधिकारी यांची
गाडी आलेली पाहून हे सहाजण घटनास्थळावरून बुलेट व डंपर सोडून पलायन केले. संशयित हे 25 ते 32 वयोगटातील असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यावरून अज्ञात सहा जणांनावर तळबीड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सपोनि वैशाली पाटील करीत आहेत.

No comments:

Post a Comment