कोर्टीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, July 30, 2018

कोर्टीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
उंब्रज: ग्वाल्हेर -बंगळूर आशियाई महामार्गावर कोर्टी गावच्या  हद्दीत भरधाव वेगात जाणार्‍या अज्ञात वाहनाची पुढे चालणार्‍या दुचाकीस्वारास पाठीमागून भीषण धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. प्रकाश रामराव पवार (वय. 40 रा. चरेगांव ता. कराड), असे अपघातात  ठार झालेल्या इसमाचे नांव आहे.
याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरुन सातारा ते कराड बाजूंकडून दुचाकीवरून जाणारे प्रकाश पवार हे रविवारी रात्री कोर्टी गावच्या हद्दीत गटविकास ऑफिससमोर आले असता त्यांच्या पाठीमागून येणार्‍या अज्ञात वाहनाची जोराची धडक बसल्याने पवार हे रस्त्यावर पडले. त्यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती उंब्रज पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. सदर घटनेची फिर्याद विलास केशव पवार (रा. चरेगांव ता कराड) यांनी उंब्रज पोलिसांत दिली असून अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार अभय तावरे करीत आहेत.

No comments:

Post a Comment