शिरढोण येथे वाळू माफियांवर कारवाई - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, August 31, 2018

शिरढोण येथे वाळू माफियांवर कारवाई



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीतील वसना नदी पात्रामध्ये अनाधिकृतरित्या वाळूचे उत्खनन, बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणार्‍या चार ट्रॅक्टर ट्रॉलीवर प्रांताधिकारी कीर्ती नलवडे आणि कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावच्या महसुल आणि पोलीस विभागाचे संयुक्त कारवाई करुन संबंधित वाळू तस्कारांच्यावर कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करुन प्रांताधिकार्‍यांनी सर्व मिळून सहा लाखाचा दंड ठोठावला. तर या वाळू तस्करी प्रकरणी कोरेगाव पोलीस स्टेशनने आठ जणांच्यावर वाळू चोरीचे गुन्हे दाखल करुन त्यापैकी चार आरोपींना तातडीने अटक केली. उर्वरीत चार आरोपींचा तपास सुरु आहे.


शिरढोण  गावच्या शिखरेचे इनामम नावच्या शिवारात वसना नदीपात्रात 31 ऑगस्ट 2018 रोजी पहाटे 4.30 सुमास कोरेगावच्या उपविभागीय अधिकारी नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी कोरेगाव पोलीस कर्मचार्‍यांच्या सहकार्याने अनधिकृत वाळू उपसा करणार्‍या वाळू अड्डयावर आणि वाळू तस्करावर  धाड टाळली. आणि वाळूने भरलेल्या चार ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करुन ट्रॅक्टर ट्रॅालीसह एकूण 13 लाख 20 हजार रुपयेचा मुद्देमाल आणि चोरलेली वाळू ताब्यात घेतली.


या वाळू तस्करी, अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी प्रांताधिकारी श्रीमती किर्ती नलवडे यांच्या सूचनेने पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी तानाजी फुलारे, रोहीत अडागळे, काशिनाथ पवार, रोहीदास फडतरे, संजय फडतरे, सुनील देंडे, सागर बर्गे, अक्षय बर्गे यांच्यावर वसना नदीपात्रातून बेकायदेशीर रित्या वाळू चोरीप्रकरणी गुन्हे दाखल केले.

No comments:

Post a Comment