महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर, जिल्ह्यातील तिघांचा समावेश - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, August 31, 2018

महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर, जिल्ह्यातील तिघांचा समावेश


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


मुंबई: अनेक दिवस रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या. नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले असून कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, महामंडळ नियुक्तीत बानुगडे यांच्यासह माजी आमदार नरेंद्र पाटील व सदाशिव खाडे या जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. या निवडीनंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. असून खाडे यांची पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे.



राज्य शासनाने विविध विकास महामंडळा, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्त्या गुरुवारी जाहीर केल्या. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे.



नाव, पद व महामंडळ पुढीलप्रमाणे: हाजी अराफत शेख (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग), उपाध्यक्ष जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर. बाळासाहेब ज्ञानदेव पाटील, सभापती, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, एस. हैदर आझम (अध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ), संजय उर्फ संजोग मारुतीराव पवार (उपाध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ), आशिष जयस्वाल (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ), प्रकाश नकुल पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ), जगदीश धोंडी (उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), उदय सामंत (अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण), ज्योती ठाकरे (अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळ), विनोद घोसाळकर (सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ), रघुनाथ कुचिक (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ), मधु चव्हाण (अध्यक्ष, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ), संदीप जोशी (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ, प्रशांत ठाकुर (अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ), तारिक कुरेशी (अध्यक्ष, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ), राजा उर्फ तुकाराम सरवदे (अध्यक्ष, महात्मा फुले, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ).



जिल्ह्यात जल्लोष


पाटील, बानुगडे-पाटील व खाडे यांच्या निवडीनंतर जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. नरेंद्र पाटील हे पाटण तालुक्यातील रहिवाशी असून त्यांच्याच पिताजींच्या नावे असलेल्या महत्त्वाच्या महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. बानुगडे पाटील हे कोरेगाव तालुक्यातील रहिवाशी असून शिवसेनेने त्यांना या माध्यमातून ताकद दिली आहे तर सदाशिव खाडे हे खटाव तालुक्यातील एनकूळ येथील रहिवाशी असून त्यांंनी आजपर्यंत पक्षासाठी दिलेल्या योगदानाची पोचपावती पक्षाने दिली आहे. 

No comments:

Post a Comment