गिरवी येथे दुहेरी हत्याकांड वडील-मुलीचा निर्घृणपणे खून, फलटण तालुक्यात खळबळ - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, September 1, 2018

गिरवी येथे दुहेरी हत्याकांड वडील-मुलीचा निर्घृणपणे खून, फलटण तालुक्यात खळबळ

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

फलटण:- गिरवी तालुका फलटण गावच्या हद्दीत चाहुर मळा नजीक दुहेरी खुनाची घटना उघडकीस आली असून वडील व त्यांची दोन वर्षाची मुलगी यांचा खून झाला आहे.या खून प्रकरणी मयत यांच्या चुलत भावास संशयित म्हणुन अटक करण्यात आली असून संशयित आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला गंभीर अवस्थेत फलटण येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 


याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरूण मिळालेल्या माहितीनुसार, किरण उर्फ पंकज भुजंगराव कदम वय अंदाजे 32 हे त्याची मुलगी कार्तिकी किरण कदम वय 2 वर्ष हे सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असणाऱ्या शेतात जनावरांना मका आणण्यासाठी मोटरसायकलवरती गेले होते. बराच वेळ होऊनही किरण कदम व त्याची मुलगी हे घरी आले नाही म्हणून घरातील व्यक्तींनी व नातेवाईक यांनी बराच शोध घेतला असता मक्याच्या शेतात रक्त आढळून आले. पुढे शोध घेताना शेतातील कोरड्या विहरीत किरण कदम यांचा मृतदेह दिसला शेजारीच मुलीचा एका पोत्यात मृतदेह आढळून आला. यानंतर नातेवाईकानी फलटण ग्रामीण पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत चौकशी करीत असताना आकाश सदाशिव कदम, वय अंदाजे 19 याला संशयित म्हणून ताब्यांत घेतले असता प्रथम त्याने पोलिसांना चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. यानंतर संशयित आरोपीने विषारी कीटकनाशक प्राशन केले. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपीस फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर आरोपीची प्रकृती बिघडल्याने त्यास फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अभिजित पाटील, फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

No comments:

Post a Comment