जनसंघर्ष यात्रेत आ. गोरेंची तोफ धडाडणार - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, September 2, 2018

जनसंघर्ष यात्रेत आ. गोरेंची तोफ धडाडणार



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
देवापूर : राष्ट्रीय काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोमवारी 3 रोजी म्हसवड मध्ये दाखल होत आहे. दुपारी 1 वाजता म्हसवड बाजार पटांगण येथे  जाहीर सभा होणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते यावेळी उपस्थित असणार आहेत.
राज्यापुढील समस्या वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने जनसंघर्ष यात्रेद्वारे आक्रमक भूमिका घेतली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेषत: जिल्ह्याच्या विविध भागासह माण  खटावमधील रखडलेल्या विकासकामांवरून काँग्रेस नेत्यांकडून शासनावर कडाडून टीका होण्याची चिन्हे आहेत. तसेच शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी योजना आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसह मराठा, मुस्लिम तसेच धनगर समाजाच्या आरक्षणांचा प्रश्‍न याबाबतही काँग्रेस नेते कोणती भूमिका घेणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
देश भाजपामुक्त करण्यासाठी आयोजित या जनसंघर्ष यात्रेचे म्हसवड मध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर . आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेस मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन काँगे्रसचे तालुकाध्यक्ष  एम .के. भोसले ,म्हसवड नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अखिलभाई काझी, नितीनभाई दोषी  बंडू धट यांनी  आवाहन केले.
वडूज व दहिवडीत या यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून म्हसवड येथे दु.1 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आ. जयकुमार गोरे यांनी या संघर्ष यात्रेची जोरदार तयारी केली आहे. जनसंघर्ष यात्रेत महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, आ. सतेज पाटील, आ.विश्‍वजीत कदम मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार आणि आजी-माजी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.  जनसंघर्ष यात्रेविषयी माहिती देताना आ.जयकुमार गोरे म्हणाले, केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या मुळावर उठले आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच त्यांचे धोरण आहे. खोटी अश्‍वासने आणि भूलथापा देऊन जनतेला फसवण्याचा उद्योग सुरु आहे. भाजपा सरकारला हद्दपार करण्यासाठी जनतेत जनजागृती करण्यासाठीच या जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत माण, खटाव तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन तालुकाध्यक्ष एम. के. भोसले आणि डॉ. विवेक देशमुख यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment