माणदेश फौंडेशन चे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, September 14, 2018

माणदेश फौंडेशन चे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
म्हसवड:
पुणे येथील माणदेश फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे माणदेशी लोकांचा स्नेह मेळावा व विविध क्षेत्रातील माणदेशी रत्नांना पुरस्कार सोहळा येत्या रविवारी (ता.१६ )सकाळी ११.३० वाजता अल्पबचत भवन पुणे येथे होणार असल्याची माहिती माणदेश फौंडेशनचे अध्यक्ष अशोक माने व उपाध्यक्ष विजयराव पिसे यांनी दिली. 
  माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख व आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणदेश फौंडेशनने आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर,जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात माजी स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार आरती बनसोडे यांना ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती पुरस्कार उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांना ,संत गाडगेबाबा महाराज स्मृती पुरस्कार बीजीएसचे शांतीलाल मुथा यांना ,तसेच सागर घोरपडे यांना उद्योजक पुरस्कार , डॉ.लक्ष्मण कोडलकर यांना वैद्यकिय पुरस्कार ,आदर्श गाव म्हणून किरकसाल गावाला,श्रीमती गंगूबाई ठोंबरे यांना आदर्श माता पुरस्कार,पै.किरण भगत यांना खेळाडू पुरस्कार ,अभिनेत्री दिप्ती सोनवणे यांना कलाकार पुरस्कार ,बापूराव गुंजवटे यांना पत्रकारितेतला जीवनगौरव पुरस्कार ,इलेक्ट्रॉनिक मिडीयातला पुरस्कार प्रियंका गोरड यांना ,आदर्श शिक्षक म्हणून डॉ.सी.जे.खिलारे यांना पुरस्काराने दगौरविण्यात येणार आहे.याशिवाय जलसंधारण कामात उल्लेखनीय काम केलेल्या टाकेवाडी , भांडवली ,बनगरवाडी ,वाघमोडेवाडी ,भाटकी या गावांचाही गौरव केला जाणार आहे.या कार्यक्रमास माण तालुक्यातील नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment