खा उदयनराजे भोसले यांना काहीजण भडकवून देत आहेत : विश्वजीतराजे - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, September 4, 2018

खा उदयनराजे भोसले यांना काहीजण भडकवून देत आहेत : विश्वजीतराजे

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

फलटण :- श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी काल सायंकाळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अचानकपणे फलटण मध्ये आले. यानंतर त्यांनी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे निवासस्थानी उपस्थित होते. 


खा उदयनराजे भोसले यांना भडकवण्यास आणि वाद निर्माण करण्यास अनेक जण कारणीभूत आहेत. आमचे वैयक्तिक कोणतेही मतभेद नाहीत, फक्त राजकीय मतभेद आहेत. आजअखेर ज्या ज्या वेळी ते आमच्या घरी आले त्या त्या वेळी आम्ही आदरातिथ्य राखत सन्मान केला आहे. आजही ते आमच्या घरी आले तेव्हा आम्ही त्यांचा सन्मान राखला व आदरातिथ्य केलं. त्यांचा हक्क आहे आमच्या घरी यायचा आमचं त्यांच्याशी अनेक पिढ्याच नात आहे. अशी प्रतिक्रिया छत्रपती उदयनराजे भोसले हे निवासस्थानाहून गेल्यानंतर श्रीमंत विश्वजीतराजे राजे नाईक निंबाळकर यांना पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांच्या अचानक येण्याविषयी विचारल्या नंतर दिली.


खा. उदयनराजे भोसले हे श्रीमंत रघुनाथराजेंच्या नाईक निंबाळकर यांच्या ‘जय-व्हिला’ या निवासस्थानी गेले होते. यावेळी खा. उदयनराजे यांनी गेटबाहेर गाडी उभी करून ते गेटपासून निवासस्थानात चालत गेले त्यावेळे निवासस्थानात आत न जाता बाहेर पोर्चमध्ये श्रीमंत रघुनाथराजेंच्या यांच्या अलिशान गाड्यांची त्यांनी पहाणी केली. त्याचवेळी, श्रीमंत विश्‍वजीतराजे व श्रीमंत संजीवराजे हे तेथे आले व त्यांनी खा. उदयनराजे यांना आत येण्यासाठी आग्रह केला. त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे यांनीही घरात या चहा घेऊ असे म्हणत स्वागत केले. मात्र, खा. उदयनराजे यांनी निवासस्थानाच्या आत न जाता बाहेरच उभे राहिले व काही वेळ थांबून निघून गेले.

No comments:

Post a Comment