चितळीच्या सुकन्येची गरुडभरारी, इंजिनिअरींच्या उच्चशिक्षणासाठी चैताली जाणार अमेरिकेला - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, September 4, 2018

चितळीच्या सुकन्येची गरुडभरारी, इंजिनिअरींच्या उच्चशिक्षणासाठी चैताली जाणार अमेरिकेला


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: चितळी (ता. खटाव) येथील चैताली पवार हिची इंजिनिअरींच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाकडून निवड झाली. तिच्या या गरुडभरारीमुळे  चितळीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ती चितळी येथील धन्वंतरी डॉ. सयाजी उर्फ आनंद पवार यांची कन्या आहे. 
मुंबई येथील एसएनडीटी युनिव्हर्सिटी संलग्नीत उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सांताक्रूझ येथून चैतालीने बी. टेक इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी संपादन केली. बोस्टन युनिव्हर्सिटीकडून तिला एम. एस. (इंजिनिअरींग मॅनेजमेंट) शिष्यवृत्ती मिळाली असून पुढील शिक्षणासाठी ती अमेरिकेला नुकतीच रवाना झाली. 
तिच्या या यशाबद्दल तिचे निवृत्त पोलीस महासंचालक रामराव पवार, लेफ्ट. कमांडर मुरलीधर सदाशिव पवार, मायणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एन. पवार, डॉ. मालोजी पवार, डॉ. अजित पवार, डॉ. विकास कदम, डॉ. जोतिराम पवार, डॉ. तोरो, डॉ. कुंभार, डॉ. तांबवेकर, डॉ. संजय काटकर, डॉ. सतीश जगदाळे, डॉ. दीपक घाडगे, डॉ. दीपक शहा, डॉ. मानाजी कदम, डॉ. भगत, डॉ. पावले, डॉ. देशचौगुले, डॉ. शरद घाडगे, डॉ. सुधाकर जाधव, यशोवर्धन पवार, डॉ. बी. जे. काटकर, तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासह वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

2 comments: