रामराजे तर मला गुरूंसारखे : उदयनराजे - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, September 4, 2018

रामराजे तर मला गुरूंसारखे : उदयनराजे


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

फलटण :  रविवारी दि. 2 रोजी येथील एका खाजगी कार्यक्रमात सहज माझ्याही जिवाला धोका आहे असे म्हटल्याने तालुक्यात खळबळ माजली होती कोणाचेही नाव न घेता आपल्या शैलीत रामराजेनी सहज बोलता बोलता चिमटा काढला आणि यानंतर कोणापासून धोका यावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. 


याच पार्श्‍वभूमीवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी, सोमवारी दि. 3 रोजी थेट शिंगणापूर ता. माण येथून श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन फलटणहुन पुण्याकडे जात असताना फलटण येथे थांबले होते त्यावेळी त्यांनी रामराजे तर गुरू आहेत. मी कशाला त्यांना धमकावेन. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांनी साने गुरुजींचे पाढे वाचावेत, असे सांगितले. जशास तसे, उत्तर देण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. तशी माझी नाही, मी दुर्लक्ष करतो. ते फार मोठं व्यक्तिमत्त्व आहे, त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखे आहे. मी कशाला त्यांना धमकी देऊ? ते तर माझ्यासाठी गुरूच्या ठिकाणी आहेत. गुरूंनी विचार केला पाहिजे. संपूर्ण जीवनात सगळ्यांबरोबर कसे वागावे. साने गुरुजींचे थोडे पाढे त्यांनी वाचले पाहिजेत. खासदारकी, आमदारकी हा विषय नाही. पण, एक व्यक्ती म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करतो. कोण बोलतोय, काय बोलतोय? हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. माझा कोण शत्रू नाही. कोण मित्रही नाही. आता तेच मला स्वयंघोषित शत्रू मानत असतील तर तो त्यांचा प्रश्‍न आहे, माझा नाही, असेही खा. उदयनराजे यावेळी म्हणाले. 


दरम्यान, खा. उदयनराजे भोसले हे श्रीमंत रघुनाथराजेंच्या नाईक निंबाळकर यांच्या ‘जय-व्हिला’ या निवासस्थानी गेले होते.यावेळी खा. उदयनराजे यांनी गेटबाहेर गाडी उभी करून ते गेटपासून निवासस्थानात चालत गेले त्यावेळे निवासस्थानात आत न जाता बाहेर पोर्चमध्ये श्रीमंत रघुनाथराजेंच्या यांच्या अलिशान गाड्यांची त्यांनी पहाणी केली. त्याचवेळी, श्रीमंत विश्‍वजीतराजे व श्रीमंत संजीवराजे हे तेथे आले व त्यांनी खा. उदयनराजे यांना आत येण्यासाठी आग्रह केला. त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे यांनीही घरात या चहा घेऊ असे म्हणत स्वागत केले. मात्र, खा. उदयनराजे यांनी निवासस्थानाच्या आत न जाता बाहेरच उभे राहिले व काही वेळ थांबून निघून गेले.

No comments:

Post a Comment