लोणंद येथे 3 फेब्रुवारीला धनगर आरक्षण अभ्यास परिषद - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, January 30, 2019

लोणंद येथे 3 फेब्रुवारीला धनगर आरक्षण अभ्यास परिषद

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

विक्रम चोरमले / फलटण : सातारा जिल्हा  धनगर समाज बांधवांच्या वतीने लोणंद येथे 3 फेब्रुवारी 2019 रोजी धनगर आरक्षण अभ्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 


धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या  प्रश्नावर गेल्या पाच वर्षांत समाजबांधवांकडून अनेक आंदोलने झाली आणि आताही सुरू आहेत. यानिमित्ताने आरक्षणाच्या प्रश्नाची चर्चा फक्त राजकीय अंगाने होत असल्याचे दिसत आहे. घटनात्मक तथ्य, पुरावे मांडणाऱ्यांची वानवा दिसत आहे. त्यामुळे समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आरक्षणाचा अभ्यास असलेल्या बुद्धीजीवी वर्गाने जाहीरपणे मांडणी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रविवार 3 फेब्रुवारी रोजी 11 ते 4 या वेळेत लोणंद नगरपंचायतीच्या हॉलमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्षस्थान अँँड. गलांडे (सातारा) हे भुषवणार आहेत. पुरावा घेवून मांडणी करणाऱ्यालाच परिषदेत बोलण्याची संधी मिळणार आहे, इथे राजकीय भाषणबाजी वर्ज्य आहे.

No comments:

Post a Comment