फलटण येथील नीरा उजवा कालव्यात पाण्यावर तेलाचा तसेच डिझेलचा तवंग वाहत असल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ (पहा व्हिडिओ) - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, January 31, 2019

फलटण येथील नीरा उजवा कालव्यात पाण्यावर तेलाचा तसेच डिझेलचा तवंग वाहत असल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ (पहा व्हिडिओ)


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

विक्रम चोरमले / फलटण :- नीरा उजवा कालव्यात दि 30 च्या सकाळ पासून पाण्यावर तेलाचा तसेच डिझेलचा तवंग वाहत असल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ माजली असून सध्या कॅनॉल मधील पाणी अनेक ग्रामपंचायत तसेच नगरपालिका हे पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असून अनेक शेतकरी हेच पाणी दुभत्या जनावरांना पिण्यासाठी वापरत असल्याने मोठ्या प्रमाणात दुषित पाणी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


सदर घटनेबाबत घटनास्थळी नागरिकांनी व नीरा उजवा कालव्याच्या संबधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण येथील कॅनॉल पुलावर नागरिकांना संपूर्ण वाहणाऱ्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर तेलाचा तवंग वाहत असल्याची बाब निदर्शनास आली यांनातर सर्व पुलावरती मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली याबाबत नीरा उजवा कालव्याच्या संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती घेतली असता अधिकाऱ्यांनी ही वेगवेगळ माहिती दिली.एकंदरीत नीरा उजवा कालवा फलटण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची एवढी मोठी घटना घडूनही कामात दिरंगाई आढळून आली. 


याबाबत संबधित ज्या भागात घटना घडली तेथील अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार तरडगाव ता. फलटण येथे तरडगाव-रावडी या कॅनॉल वरील पुलावर काल रात्री अज्ञात व्यक्तीने कॅनॉल भरावावर ऑइल फेकले व ते ऑइल वाहत्या पाण्यात मिसळले त्यामुळे वाहत्या पाण्यात सर्वत्र तेलाचा तवंग पहायला मिळत होता. सदर दूषित पाण्याने प्रभावित होत असलेल्या भागातील ग्रामपंचायत व नगर परिषद यांना पाणी पिण्यासाठी न वापरण्याबाबत कळवण्यात आले असल्याची माहिती संबधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


फलटण तालुक्यातील नीरा उजवा कॅनॉलच्या दोन्ही बाजुकडील भरावाची फार वाईट स्थिती असून यावर होणारी वाहतुकीमुळे भराव खचत चालला आहे. संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने बेकायदेशीरपणे थेट कॅनॉल व फाट्या मधून होणारी पाणी चोरी, कॅनॉल व फाट्यावर होत असलेली अतिक्रमणे यामुळे शेतकऱ्यांच्या जीव टांगणीला लागला आहे. थेट कॅनॉलचा भराव तळापर्यत खोदून अनधिकृतपणे पाईप टाकुन पाण्याची चोरी होत आहे अशा खोदकामामुळे भराव ढासळत आहेत परंतु नीरा उजवा कॅनॉलचे अधिकारी या सर्व गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यानी नाराजी व्यक्त केली. संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


पाण्यावर मोठ्या प्रमाणावर तेलाचा तवंग व पाण्यास येणारा वास पहाता फार मोठ्या प्रमाणावर पाणी दूषित झाले होते परंतु नीरा उजवा कॅनॉलचे अधिकारी यांच्या माहितीनुसार ऑइल फेकण्यात आल्याची बाब व एकंदरीत परस्थिती यात तफावत आढळून येत होती.

No comments:

Post a Comment