पांढरेपाणी गावाला काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली : -सत्यजितसिंह पाटणकर - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, January 30, 2019

पांढरेपाणी गावाला काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली : -सत्यजितसिंह पाटणकर

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

पाटण (संजय कांबळे):- पांढरेपाणी गावचा आत्तापर्यंत देसाई गटाने केवळ मतांपुरता वापर केल्याने,पांढरेपाणी गावाला काळ्या पाण्याची शिक्षा कायमचं मिळाली. त्यामुळे गेली 29 वर्षे सातत्याने त्यांची पाठराखण केलेल्या पांढरेपाणी गावच्या लोकांनी देशात,राज्यात जे परिवर्तन सुरू आहे तेच परिवर्तन पाटण तालुक्यात करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यापुढे त्यांना आवश्यक त्यासर्व सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध राहील. अशी ग्वाही युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिली.


तालुक्यातील मोरणा विभागातील पांढरेपाणी गावच्या ग्रामस्थांनी  सत्यजितसिंह पाटणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, नथुराम मोरे,विश्वासराव देशमुख, संदीप कोळेकर,संजय हिरवे,राजाभाऊ जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले की,माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी रस्त्यांच्या माध्यमातून डोंगरावरची माणसे एकमेकांना जोडण्याचे काम केले आहे.पाटण तालुक्यात विकास कामांच्या वचनपूर्तीचे राजकारण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पांढरेपाणी गावाने प्रवेश केला त्या सर्वांचे मी स्वागत करतो व पांढरेपाणी गावच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार असे सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले.


पांढरेपाणी गावातील ग्रामस्थ म्हणाले,पाटण तालुक्यात गेल्या चार वर्षात विकास खोटया निधीच्या अफवा लोकांना सांगून लोकांना फसविण्याचे काम केले जात आहे.आम्हालाही आजपर्यंत विकासापासून वंचीत ठेवून आमचा फक्त मतांपुरता उपयोग केला. आम्हाला  आरोग्य, रस्ते या मुलभूत सुविधा पासून वंचित ठेवाले. फक्त सभामधुन कोटयावधीचा निधीच्या गोष्टी करायचा. या सर्व गोष्टीला आता मोरणा विभागातील सर्वसामान्य जनता कंठाळली आहे. आता तालुक्यातील विकासाच्या सकारात्मक राजकारणाच्या मागे राहण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. सर्व गाव एकमुखी देसाई गटाला रामराम करत राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करत आहोत आणि येथून पुढे सत्यजितसिंह पाटणकर यांच्यापाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय आम्ही एकमुखाने घेत आहोत. यावेळी लक्ष्मण शेळके,भागूजी शेळके,विठ्ठल शेळके,बाबुराव शेळके,प्रकाश शेळके,धोंडिबा शेळके,देवजी शेळके,राम शेळके, बबन शेळके, बाबुराव कोंडीबा शेळके,दगडू बाबू शेळके,कोंडीबा बबन शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

No comments:

Post a Comment