पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास सापळा रचून अटक - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, January 30, 2019

पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास सापळा रचून अटक




कराड :  कराड शहर परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगार सापळा रचून पकडण्यात कराडच्या पोलीस पथकास यश आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील विशेष पथकाने केली. सोमनाथ अधिकराव सूर्यवंशी राहणार ओगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा असे या प्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्यावर सातारा व पुणे जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त आहे कराड शहर परिसरात सराईत गुन्हेगार पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांना मिळाली. हा धागा पकडून नवनाथ ढवळे यांनी याबाबत अधिक माहिती जमा करत संबंधित संशयाचा माग काढला.  दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तो मार्केट यार्ड परिसरात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली या माहितीच्या आधारे ढवळे यांनी पोलीस उपनिरीक्षक शेलार हवालदार बीएच जगदाळे के.जी. दुबळे प्रवीण पवार, संदीप पवार, आसिफ जमादार, संतोष चव्हाण, शंकर गडांकुश, सागर बर्गे, चंद्रकांत पाटील, सौरभ कांबळे, दीपक कोळी, विजय माने, सुधीर जाधव, रमेश बरकडे यांची तयार करून मार्केट यार्ड परिसरात सापळा रचला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार मार्केट एड गेट नंबर एक वर एक संशयित तरुण चालत जात असल्याच्या पोलिसांच्या लक्षात आले. त्याच्या संशयित हलचाली पोलिसी नजरेने अचूक टिपत त्याला पुस्तकातील जवानांनी राखले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव सोमनाथ अधिकराव सूर्यवंशी राहणार ओगलेवाडी असल्याचे सांगितले. व त्याची अंगझडती घेतली तरी त्याच्याकडे पिस्तूल मिळून आले. त्यामध्ये एक जिवंत काडतूस होते याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment