पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस: दत्ता मर्ढेकर - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, January 30, 2019

पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस: दत्ता मर्ढेकर




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


वाई : नागरिकांना फिरण्याची आवड असते. परंतु, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यासाठी पर्यटन व्यावसायिकांची मोलाची मदत होते. इथून पुढच्या काळात पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर यांनी केले. 

सातारा येथील कुलकर्णी टूर्सने वाईतील गणपती आळीत शाखा सुरु केली असून या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कायक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव सरकाळे, शिवसेनेचे शहरप्रमुख गणेश जाधव, वाई पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्‍वास पवार, दैनिक सत्य सह्याद्रीच्या संपादक शिल्पा कुलकर्णी, कार्यकारी संपादक संदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होते.

मर्ढेकर म्हणाले, आम्ही कुलकर्णी टूर्सचे नाव ऐकून होतो. वाई येेथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल. वाईतील नागरिक हौशी तसेच सर्व व्यावसायिकांना मदत करणारे देखील आहेत. 

अशोकराव सरकाळे म्हणाले, दक्षिण काशी असलेल्या वाई येथील नागरिकांची पर्यटनाची भूक कुलकर्णी टूर्समुळे निश्‍चितपणे पूर्ण होईल. त्यांना आपण सर्वतोपरी मदत करु. 

विलास कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विनोद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी आभार मानले. 

यावेळी पत्रकार धनंजय घोडके, पांडुरंग भिलारे, भद्रेश भाटे, सचिन ननावरे, पूजा कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी सातारा तसेच वाई शहरातील अनेक नागरिकांनी शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment