जावळीच्या माजी सभापती अरुणा शिर्के यांचे सदसत्व रद्द - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, January 30, 2019

जावळीच्या माजी सभापती अरुणा शिर्के यांचे सदसत्व रद्द





आनेवाडी :-ग्रामपंचायतीचा कर न भरणे यासह विविध कारणांसाठी जावली पंचायत समितीच्या माजी सभापती आणि विद्यमान सदस्य अरुणा शिर्के तसेच त्यांचे पती आणि ग्रामपंचायत सदस्य अजय शिर्के यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी रद्द केले.  त्यामुळे जावली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत कृष्णा शिंदे यांनी अरुणा शिर्के व अजय शिर्के यांच्या विरोधात ग्रामपंचायत कर न भरणे यासह विविध मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून या प्रकरणी सुनावणी सुरू केली होती. कागदपत्रांची तपासणी आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी अरुणा शिर्के यांचे पंचायत समिती तर अजय शिर्के यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले.

अरुणा शिर्के या म्हसवे गणातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. त्यांना प्रारंभीच सभापतिपदाची संधी देण्यात आली होती. तसेच त्यांचे पती अजय शिर्के वडाचे म्हसवे या गावचे उपसरपंच पदाचा कार्यभार सांभाळला होता.  

No comments:

Post a Comment