फलटण येथे कोट्यावधींची फसवणुक केल्या प्रकरणी पतसंस्थेच्या १३ जणांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, February 1, 2019

फलटण येथे कोट्यावधींची फसवणुक केल्या प्रकरणी पतसंस्थेच्या १३ जणांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क


फलटण :-  चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामिण बिगर सह पतसंस्था मर्या. कोळक फलटण पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करुन कोट्यावधींची फसवणुक व विश्वासघात केल्या प्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक संचालक व सदस्य अशा १३ जणांच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामिण बिगर सह पतसंस्था मर्या. कोळक फलटण पतसंस्थेचे व्यवस्थापक संचालक व सदस्य नितीन शांतीलाल कोठारी, माधव कृष्णा आदलिंगे, प्रदिप बापूचंद गांधी, धनेश नवलचंद शहा, अजित रमनलाल दोशी, हर्षद मोहनलाल शहा, भुषन कांतीलाल दोशी, नाना खंडू लांडगे, जावेद पापाभाई मणेर, लाला तुकाराम मोहिते, सुरेखा विरचंद मेथा, स्नेहल नेमचंद मेहता, अजय अरविंद शहा अशा वरील  सर्व राहणार फलटण ता - फलटण जि - सातारा यांच्या विरोधात फिर्यादी राजेश मोहनलाल दोशी, वय-४०,व्यवसाय-मेडिकल स्टोअर, रा-बुआसाहेब नगर कोळकी, ता - फलटण जि - सातारा फिर्यादी व साक्षिदार यांची मिळून १,३३,६२,२०१/- रकमेच्या व फिर्यादी भाग्यश्री कमलाकर भट, वय-२७, व्यवसाय- वकीली, रा - सगुणामाता नगर मलटण ता - फलटण जि - सातारा फिर्यादी व साक्षिदार यांची मिळून ९,०९,२०९/- रकमेच्या चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामिण बिगर सह. पतसंस्था मर्यादीत कोळकी ता - फलटण पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत देण्यास वेळोवेळी टाळाटाळ करुन फसवणुक व विश्वासघात केल्या प्रकरणी सदर पतसंस्थेचे वरील १३ व्यवस्थापक संचालक व सदस्य यांचे विरुद्ध फिर्याद दिलेने भा.द.वि.स कलम ४२० , ४०६ , ४०९ , ३४ प्रमाणे फलटण शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment