फलटण येथे वृद्धेची जमीन प्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी अँट्रॉसिटी अँक्टनुसार सहा जणांवर गुन्हा दाखल - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, February 1, 2019

फलटण येथे वृद्धेची जमीन प्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी अँट्रॉसिटी अँक्टनुसार सहा जणांवर गुन्हा दाखल

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

फलटण :- ताराबाई गायकवाड या ७३ वर्षीय वृद्धेची जमीन फसवून खरेदी केल्याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यामधील ३ (१)एफ तरतुदीनुसार व भा.द.वी ४२०, ३४ अंतर्गत जमीन व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणात सहा व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, शशिकांत विजय मोहिते, ताराबाई नारायण गायकवाड , स्वाती प्रशांत मोरे यांनी उपविभागीय अधिकारी फलटण (प्रांत) यांना २६ जानेवारी रोजी पासून बेमुदत उपोषणाला बसण्यासाठी निवेदन दिले होते. तक्रार अर्ज व निवेदनानुसार मौजे नांदल ता. फलटण जि. सातारा येथील गट नं २६४ क्षेत्र २ है ११ आर या शेतजमीनीचे वारसदार यांची नोंद ७/१२ सदरी असतानाही संमती न घेता चार वेगवेगळ्या खरेदीखताच्या अधारे जगन्नाथ काशिनाथ कोळेकर, बाळू काशिनाथ कोळेकर, ज्ञानदेव काशिनाथ कोळेकर, चंद्रशेखर वसंत जगताप , तनय गणपतराव धुमाळ, विजय शामराव जाभळे तसेच तलाठी, मंडलाधिकरी व दुय्यम निबंधक यांना हाताशी धरून तक्रारदार यांचा जमीनीवरती मालकी हक्क असतानाही फसवणुक करून जमीन लाटण्याचा प्रयत्न केला होता. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यामधील तरतुदीनुसार जमिनीचा ताबा सोडण्यास भाग पाडणा-या तसेच त्रास देणा-या तसेच  मालकी हक्काची जमीन परस्परपणे विनापरवानगी कोणताही मोबदला न देता विक्री व खरेदी करण्याऱ्या व्यक्तीच्या व त्यांस मदत करणा-या शासकीय कर्मचारी तसेच संबधीत जबाबदार व्यक्तीच्यावर गुन्हा दाखल होणेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समवेत सर्व महसूल व पोलिस कार्यालय यांना संबंधीत व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल होणेबाबत तक्रार अर्ज व निवेदन दाखल केले होते. 


संबधीत व्यक्तीच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यामधील ३ (१)एफ तरतुदीनुसार गुन्हा दाखल करावा अन्यथा  २६ जानेवारी २०१९ पासून नारायण गायकवाड या वृद्ध महिला उपोषणाला बसणार होत्या. सदर प्रकरणात तहसीलदार विजय पाटील यांनी सर्व अभिलेखाची पडताळणी करून तक्रारदार यांच्या जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याची बाब पुराव्यानिशी अहवालानुसार उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली व उपविभागीय अधिकारी यांनी तत्काळ कारवाईचे आदेश तहसीलदार यांना दिले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अभिजात पाटील यांनी तत्काळ सदर प्रकरणी कारवाई करत गुन्हा दाखल करण्याचा आदेश बजावला. यानुसार जगन्नाथ काशिनाथ कोळेकर, बाळू काशिनाथ कोळेकर, ज्ञानदेव काशिनाथ कोळेकर, चंद्रशेखर वसंत जगताप, तनय गणपतराव धुमाळ, विजय शामराव जाभळे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यामधील ३ (१) एफ तरतुदीनुसार व भा.द.वि.स ४२०, ३४ अंतर्गत जमीन व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणात सहा व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments:

Post a Comment