स्वातंत्र्य सैनिक स्व. भाई भडकबाबा पाटणकर साहित्य संमेलनाची पुर्व तयारी पुर्णतवास - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, February 1, 2019

स्वातंत्र्य सैनिक स्व. भाई भडकबाबा पाटणकर साहित्य संमेलनाची पुर्व तयारी पुर्णतवास

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

पाटण:-  स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भाई भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृतीदिना निमित्त दोन आणि तीन फेब्रुवारीला पाटण मध्ये  दोन दिवसीय चौथे साहित्य संमेलन होत असून या संमेलनाची पुर्व तयारी पुर्णत्वास आली आहे.  संमेलनात स्वराज्य रक्षक "छत्रपती संभाजी" या मालिकेतील संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेतील अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, छ. श्रीमंत उदयनराजे भोसले, नितीन बानुगडे-पाटील, महाराष्ट्र - ऐकीकरण समितीचे अध्यक्ष व कर्नाटक सिमा वाद लढ्यातील सैनिक आ. दिगंबर पाटील, चित्रपट पथकथा लेखक प्रताप गंगावणे आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांची उपस्थितीची प्रतिक्षा साहित्य प्रेमी प्रेक्षकांना लागली आहे.


येथील स्वातंत्र्य सैनिक भाई भडकबाबा नगर येथे दोन दिवसीय साहित्य संमेलनात शनिवार दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. पाटण शहरातून भव्य ग्रंथ दिंडी व शोभा यात्रा होणार असून या मधे पाटण शहर व परिसरातील सर्व शाळांचा समावेश असणार आहे. तर सकाळी ११ वाजता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले, चित्रपट पटकथा लेखक प्रताप गंगावणे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कथाकथनकार  सतीश कचरे यांचे कथाकथन, आणि  प्रदिप कांबळे, प्रा. सौ. विजया म्हासुर्णेकर यांच्या सोबत पाटण तालुक्यासह जिल्ह्यातील कवीचें कवी संमेलन होणार आहे. तर सांयकाळी स्थानिक कलाकारांचा मनोरंजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.


साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वा. स्वातंत्र्य सैनिक कै भाई भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिक्षण महर्षि  पाटण तालुक्याचे सुपूत्र कै. बापुजी सांळुखें यांना मरणोत्तर मानपत्र स्वामी शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांना देण्यात येणार आहे. यावेळी शिव व्याख्याते नितीन भानुगडे पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आ. दिगंबर पाटील यांची व्याख्याने होणार असुन भाई भडकबाबा यांच्या कार्याचा आडावा अरुण खांडके मांडतील. त्याचवेळी श्री स्वामी समर्थ संस्थान दिंडोरी यांचे आयुर्वेदिक आरोग्य शिबिर व मोफत तपासणी करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात समारोप होणार असून माध्यम तज्ञ विश्वास मेहंदळे, आ. शंभुराज देसाई, धारेश्वर मठाधिपती डॉ. निलकंठश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शन व विक्री यांचे भरगच्च स्टॉल लागणार असून कोणताही ग्रंथ फक्त सत्तर रूपये ऐवढ्या कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. 


साहित्य संमेलन मधील काव्य संमेलनासाठी काव्य ३१ जानेवारी पर्यंत पाठवावे

        

पाटण तालुक्यातील किंवा तालुक्याबाहेरील कविंनी आपले काव्य ३१ जाने पर्यंत काव्य संमेलन संयोजिका प्रा. सौ. विजया म्हासुर्णेकर मु.पो. पाटण ता.पाटण जि. सातारा मो नं ९७६३४१४९७८ - ८८५६०७३४२० यावरती पाठवून द्यावे असे आवाहन काव्य संमेलन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ऐनवेळी आलेली काव्य स्विकारली जाणार नसल्याने उस्फुर्त कवींनी आपले एकचं काव्य पाठवून द्या. असे ही यावेळी सांगण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment