विद्यार्थी पालकांसाठी रविवारी सातार्‍यात नित्यानंद अनुभूती - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, March 2, 2019

विद्यार्थी पालकांसाठी रविवारी सातार्‍यात नित्यानंद अनुभूती


सातारा :  नित्यानंद फौंडेशन आयोजित ‘नित्यानंद अनुभूती’ या किशोरवयीन मुलांकरिता व पालकांकरिता मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. 3 मार्च रोजी स्वराज सांस्कृतिक भवन, संगमनगर सातारा येथे दुपारी 12 ते 2. 30 या वेळेत करण्यात आले असल्याची माहिती संयोजक डॉ. प्रमिला गोसावी माई यांनी दिली.
यामध्ये पाचवीपासून पुढील विद्यार्थ्यांकरिता हा कार्यक्रम आयोजित केला असून विद्यार्थी व पालकांसोबत आत्मीय संवाद साधला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक आणि वैचारिक  विश्‍वाला समजून घेण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या लक्षप्राप्ती नसेच उज्ज्वल भविष्यासाठी ऊर्जा विज्ञानावर आधारीत मार्गदर्शन होणार आहे. पालक व मुले या नात्यावरही सुसंवाद साधला जाणार आहे. मुलांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक उर्जेचे संतुलन राखून बौद्धिक विकास कसा साधता येईल याबाबत मार्गदर्शन, तसेच भीती, आत्मविश्‍वासाची कमतरता, नैराश्य यासारख्या विकारांपासून ऊर्जाशक्तीद्वारे कसे मुक्त राहता येऊ शकते यावर ऊर्जाशक्ती क्रिया आणि ध्यानसाधनेद्वहारा अनुभूतीयुक्त मार्गदर्शन होणार आहे. यासाठी 50 रुपये प्रवेश शुल्क असून इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. प्रमिला गोसावी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment