भाजपला म्हसवडवर भरवसा नाय काय? - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, April 18, 2019

भाजपला म्हसवडवर भरवसा नाय काय?


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


म्हसवड: एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा प्रचाराच्या तोफा धडाडत असताना माढ्यातील मतदानाला शेवटचे 72 तास उरले आहेत. म्हसवडमध्ये  टोलेजंग सभा अथवा रॅली घेेण्यास कोणताच पक्ष पुढे येत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे भाजपची नियोजित रॅली व मंत्री मुनगंटीवार यांची सभा कडक उन्हामुळे  रद्द केल्याने माढ्यात भक्कम असलेल्या व पावलो पावली  भाजपाचे नेते जिकडे पहावे तीकडे दिसत असताना ही अवस्था झाल्याने भाजपला म्हसवडवर भरवसा नाय काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचे प्रचार करणारे राष्ट्रवादीचे म्हसवडचे युवराज सुर्यवंशी , पृथ्वीराज राजेमाने  यांनी दोनवेळा म्हसवड येथे कोपरा सभा घेतल्या असून डझनभर नेते असणार्‍या भाजपा मध्ये मेळ नसल्याने प्रत्येकजण नेता झाल्याच येथे दिसत आहे. 


माढा लोकसभेचा बिगूल वाजुन एक महिना झाला उमेदारी वरुन पंधरा ते वीस दिवस आदला बदली, ह्या पक्षाचा नेता आपल्या पक्षात खेचण्याच्या भाजपा व राष्ट्रवादीने जनु काय स्पर्धा लावली होती. अखेर भाजपाने चक्क राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा दोन महिण्यापूर्वी अध्यक्ष पदाची धुरा घेतलेले रणजितसिंह निंबाळकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी देवून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याच्या नेत्याचे नाकच कापले तर तिकडे भाजपाचे जि प अध्यक्ष असलेल्या संजयमामा यानी भाजपाला नमो नमो करत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधल्याचे समजताच आमदार गोरे यानी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जोरका झटका देत माढ्यात राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही व आघाडी धर्म हि माढ्यात नाही मात्र सातार्‍यात आघाडी पाळणार असे जाहीर करुन आ. गोरे यानी दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत सोसायट्या वाड्या वसत्यावर रणजितसिंहच्या प्रचाराचे रान उठवले, या दोन तालुक्यातील काँग्रेसचे आ. जयकुमार गोरे व त्याचे बंधू शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला व भाजपाला बाहेरुन पाठीबा देत भाजपाचा प्रचार सुरु केला. 


आज माढ्यात एक डझन भर नेते भाजपाचा प्रचार करत आहेत. त्यात  भाजपाने तर माण खटाव तालुक्यातील  विधानसभा लढलेले पाच नेते आमदार गोरे सह माजी आ. दिलिप येळगावकर , हरणाईचे रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई , शेखरभाऊ गोरे असताना व या पाच हि नेत्याचे अस्तित्व,  सत्ता म्हसवड मध्ये असताना एक हि ना प्रचार रँली काढली ना सभा ना कोपरा सभा घेतली गेली. मात्र, म्हसवड मध्ये रोज तिन ते चार भाजपा नेते कार्यक्रत्याना भेटताना दिसत आहे या उलट भाजपाचा हिच नेते मंडळी ग्रामीण भागात जोरदार प्रचाराचे रान उठवून दिले असले तरी म्हसवड हे पालिकेचे शहर व पंचवीस हजार लोक वस्तीचे शहर व राजकीय दृष्टीने संवेदनशिल असलेल्या शहरावर अनेकानी आपली पक्कड मजबुत करण्याचा प्रयत्न केला मात्र ते भल्या भल्याना आज पर्यंत जमले नाही आज पर्यत फक्त राजेमाने घराण्याने एक हाती सत्ता चाळीस वर्ष ठेवली होती त्यानंतर आज पर्यंत म्हसवडकराचा अंदाज कोणालाच सापडला नसल्याने या लोकसभेला म्हसवडकर राष्ट्रवादीला सहकार्य करणार का?  म्हसडकरांनी कधी ही भाजप पक्षाला सहकार्य केले नाही त्या भाजपाच्या उमेदार असलेले रणजितसिंह यांना म्हसवड कर मदत करणार  याची उत्सुकता लागली आहे.

No comments:

Post a Comment