माणमध्ये चक्क पाणी टँकरची परस्पर विक्री - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, May 21, 2019

माणमध्ये चक्क पाणी टँकरची परस्पर विक्री



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
......................................................................
म्हसवड :  नेमुन दिलेल्या गावाला पाणी न देता ढाकणी फिडिंग पॉइंटवरून पाणी भरलेला टँकर इतर ठिकाणी परस्पर विकण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी टँकरचालक बाबा केरु पुकळे याच्याविरोधात म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीविक्रीच्या या प्रकाराने माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
  या बाबत म्हसवड पोलिसात दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे, ढाकणी येथील फिडींग पँईन्टवरुन पाण्याने भरलेल्या टँकरच्या खेपा काळचौंडी गावी नेमून दिल्या असताना दिनांक 10, 11, 12, 13 मे 2019 या दिवशी पाण्याचा टँकर येथे न जाता इतरत्र नेत असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना एमएच 43-7974 हा टँकर कोरेवाडी-कापुसवाडी रस्त्यावर आढळला. टँकरचालक बाबा केरु पुकळे याच्याकडे त्यांनी चौकशी केली असता महाबळेश्वरवाडीला पाणी देण्ीयासाठी निघाल्याचे सांगितले. शिंदे यांनी सदर नंबरच्या टँकरकडे कोणत्या गावाच्या खेपा आहेत हे रजिस्टर मध्ये पाहून यांची चौकशी करण्याचे आदेश बीडीओ व विस्तार अधिकारी यांना दिले होेते. वरील दोन्ही अधिकार्‍यांनी तात्काळ ढाकणी फिडींग पँईन्टवर टँकरच्या खेपा कोणत्या गावाला कोणते टँकर आहेत हे रजिस्टर पाहिले असता वरील नंबरच्या टँकर चालकाकडे काळचौंडी गावातील खेपा होत्या. मात्र सदर टँकर चालक बाबा पुकळे यांनी गेले चार दिवस काळचौडीला खेपाच दिल्या नसल्याच ग्रामस्थांनी सांगीतल्याने सदर टँकर चालकाने ढाकणी फिडींग पँईन्टवरुन पाणी चोरून नेले असल्याचे उघड झाल्याने  बाबा केरु पुकळे रा. गट्टेवाडी यांच्यावर म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल करण्या संबधी अर्ज विस्तार अधिकारी एम. एस. अडागळे यांनी दिला.
तालुक्यात संताप
ाण तालुक्यात संताप व्यक्त होत असुन ऐन दुष्काळात टँकरच्या पाण्यासाठी रात्र रात्र जागत असणार्‍या जनतेच्या तोंडातील पाणी इतर ठिकाणी पाणी विकण्याच्या प्रकाराने प्रशासन खडबडून जागे झाले. दुष्काळात पाण्याची चोरी करणारे टँकर चालकाची मुजोरी वाढत चालली असून यापूर्वीही पाण्याची चोरी होत असल्याचे जिल्हा परिषदेत आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर टँकरला जीपीएस सुविधा जोडण्याची मागणी झाली होती. या चोरीत चक्क माण तालुक्यातील राजकीय पुढारीच यात सामिल असल्याचा आरोप झाला होता. मात्र, हे पाणी चोरीचे प्रकरण त्यावेळी दाबण्यात आले होते. पुन्हा शासकीय टँकरने पाण्याची चोरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनीच  पकडल्याने या पाणीचोरीला नक्की अभय कोणाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीईओ या पाणी चोरीची संपूर्ण पाळेमुळे खणून काढणार का? असा सवाल विचारला जात आहे.

No comments:

Post a Comment