रणजितसिंहांचे फलटणमध्ये जंगी स्वागत - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, May 24, 2019

रणजितसिंहांचे फलटणमध्ये जंगी स्वागत




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
.........................................
फलटण : माढ्याचा गड जिंकल्यावर फलटण च्या सुपुत्राचे जंगी स्वागत करण्यात आले या वेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मिरवणूक काढण्यात आली या वेळी त्यांचे बरोबर आमदार जयकुमार गोरे,  माजी आमदार दिलीप येळगावकर उपस्थित होते.
अतिशय अटीतटीच्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारीत फलटणचे नाव लोकसभेच्या माध्यमातून तब्बल 23 वर्षानंतर कोरले. विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर आल्यावर त्यांचे स्वागत क्रांतिसिंह नाना पाटील चौकात गुलाल, ढोल-ताशांच्या गजरात जेसीबी मधून गुलाल उधळत उघड्या जीपमधून मोठी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी फलटणकर व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकसभेत त्यांचे पिताश्री माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेचे माध्यमातून 1996 साली सातारा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर तब्बल 23 वर्षांनी नव्याने 2009 साली स्थापन झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून   घसघशीत विजय मिळवला. यामुळे पहिल्यांदाच आपल्या जन्मभूमीत आलेल्या सुपुत्राला शुभेच्छा देण्यासाठी अवघा युवक गोळा झाला होता. या वेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते दिगंबर आगवणे, अनुप शहा, जयकुमार शिंदे, सुशांत निंबाळकर, अशोकराव जाधव, राजेंद्र नागटिळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment