टेंभूच्या पाणी लढ्यात सर्व शक्तीनिशी जनतेसोबत: सुरेंद्र गुदगे - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, June 15, 2019

टेंभूच्या पाणी लढ्यात सर्व शक्तीनिशी जनतेसोबत: सुरेंद्र गुदगे

 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी
अनियमित  पर्जन्यमान व जमिनीतील खालावलेली पाणीपातळी ही दुष्काळी पट्ट्यासाठी भविष्यातील मोठ्या संकटाची चाहूल आहे.पावसाचे महत्त्व ओळखून पावसाचा थेंब अन थेंब आडविणे ही काळाची गरज आहे.सामान्य शेतकऱ्यांना हक्काचे जलस्तोत्र  निर्माण व्हावेत  या भावनेतून मायणी जिल्हा परिषद गटात बंधाऱ्याचे जाळे निर्माण करण्यावर आपण लक्ष केंद्रित केले आहे. या परिसराचा शेती पाण्याचा प्रश्न हा टेंभू योजनेतील पाण्याद्वारे सुटू शकतो. टेंभूच्या पाण्यासाठी जनतेच्या लढ्यात आपण सर्व शक्तीनिशी  कायम जनते सोबतच असल्याचे प्रतिपादन जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.
जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर केलेल्या साडेसतरा लाख रुपये निधीतून कानकात्रे (मसोबा मंदिर परिसरात)ओढ्यावरील साठवण बंधार्‍याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.सरपंच रामचंद्र जाधव,माजी सरपंच  तानाजी जाधव, मनोहर जाधव, अशोक जाधव ,रामचंद्र देशपांडे ,जालिंदर जाधव , .एस. कचरे ,  प्र काश कणसे  यांची प्रमुख उपस्थिती होती.
 गुदगे पुढे म्हणाले आपण दुष्काळी टप्प्यात आहोत .पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आपण जाणतो.  पाणीबचत व जलसंवर्धन करण्याच्या कामात ग्रामस्थांनी आपला  वाटा उचलावा . टेंभूच्या पाण्याची लढाई ही आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असून या आरपारच्या लढाईमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी सतत सर्व शक्तीनिशी तुमच्यासोबत राहणार आहे.
किरण जाधव यांनी स्वागत केले. अनिल सावंत यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment