फलटण नगर परिषदेचे नगरसेवक अनुप शहा यांना अपात्र करण्याचे आदेश - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, June 1, 2019

फलटण नगर परिषदेचे नगरसेवक अनुप शहा यांना अपात्र करण्याचे आदेश


सातारा प्रतिनिधी
 फलटण नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अनुप रमणलाल शहा यांना अपात्र करण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी दिले . पुढील पाच वर्षासाठी शहा यांना अपात्र ठरवण्यात आल्याने फलटणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . पालिकेतील लिपिकाला  चप्पल काढून मारहाण केल्याचा प्रकार चौकशीत सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार ही कारवाई करण्यात आली .  29 मे 2019 रोजी नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची प्रत शनिवारी जिल्हा प्रशासनाकडून फलटण नगरपालिकेला प्राप्त झाली .1965 च्या  42 नुसार ही कारवाई करण्यात आली . 4 ऑक्टोबर 2017 रोजी बांधकाम विभागाचे लिपिक कुंभार यांना कागदपत्रांची मागणी करूनही न दिल्याच्या रागातून शहा यांनी त्यांना चप्पल ने मारण्याचा ठपका होता . या प्रकरणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे  13 2018 व  9 जानेवारी 2019 व  12 फेब्रुवारी2019 रोजी तीन . वेळा सुनावणी झाली . शहा यांनी त्यांच्या खुलाशात या आरोपाचा इन्कार केला होता . मात्र तक्रारदाराने माडलेली बाजू, सादर झालेली कागदपत्रे व फलटण मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सादर केलेला अहवाल व दाखल  सीडी यांची सत्यता पडताळली असता शहा दोषी असल्याचे दिसून आले . महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत नागरी   अधिनियम 1965 चे कलम 42 (1) व कलम 42(4) शहा यांना अपात्र करण्याचे आदेश नगरविकास राज्य मंत्र्यांनी दिले .

No comments:

Post a Comment