डॉ. दिलीपराव येळगावकरांनी जपले सामाजिक भान वाढदिवसानिमित्त छावणीत पेंड, टाकीवाटप, शुभेच्छांसाठी खटाव-माणमधून सामान्य कार्यकर्त्यांची मांदियाळी - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, June 1, 2019

डॉ. दिलीपराव येळगावकरांनी जपले सामाजिक भान वाढदिवसानिमित्त छावणीत पेंड, टाकीवाटप, शुभेच्छांसाठी खटाव-माणमधून सामान्य कार्यकर्त्यांची मांदियाळी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
................................................
म्हसवड : खटाव-माण तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे नेते डॉ. दिलीपराव येळगावकर यांचा वाढदिवस आज साधेपणाने साजरा करण्यात आला. शिवाय माण तालुक्यात असणार्‍या भीषण दुष्काळी परिस्थिती  लक्षात घेऊन त्यांनी वाढदिवसा निमित्त माण खटाव तालुक्यातील सुमारे 57 छावण्यांमध्ये पाण्याच्या टाक्या आणि पेंड वाटप करुन समाजभानही जपले. दरम्यान, आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी खटाव-माण तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अक्षरश: रीघ लावली होती.
माण-खटाव तालुक्यात पाऊस नाही त्यामुळे सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी चार्‍याची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी जनावरे जगवण्यासाठी प्रशासनाने छावण्या काढून पशुधन वाचवणे सुरु केलं आहे. गावेच्या गावे छावणीत आहेत. या कारणाने शेतकरी हतबल होऊन गेला आहे.  ह्या परिस्थिती मुळे वाढदिवस डामडौलात न करण्याचे आवाहन डॉक्टरांनी कार्यकर्त्यांना केले होते.त्यानुसार आज माण खटाव तालुक्यातील 57 छावण्या मध्ये जाऊन तिथे पाणी साठवण करण्यासाठी 2000 हजार लिटर क्षमता असणार्‍या पाण्याच्या टाक्या वाटप करण्यात आले या बरोबर पेंडीचे एक पोते ही देण्यात आले गोंदवले खुर्द मध्ये या टाकीचे वितरण करण्यात आले यावेळी डॉ येळगांवकर म्हणाले, सध्या निसर्गाने आपल्यावर खूप मोठा अन्याय केला आहे वळीवाचा पाऊस पण यावर्षी झाला नाही त्यामुळे पाणी क्षमता कमी झाली असून जनावरांना जगवणे मुश्कील झाले आहे यामुळे आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करणार नाही असे सांगितले.
यावेळी माण तालुका भाजप अध्यक्ष बाळासाहेब मासाळ, खटाव तालुक्याचे संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष विजयराव शिंदे, अमोल पोळ, दत्तात्रय अवघडे,हिंदुराव पोळ, आप्पासो फाळके, अर्जुनराव शेडगे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मिरजचे आमदार सुरेश खाडे, खासदार आणि राज्याचे मंत्री गिरीश बापट, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शेखर चरेगावकर, मनोज घोरपडे, अनिल देसाई, महेश शिंदे, मायणीचे युवा नेते व सरपंच सचिनभाऊ गुदगे, चितळी येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पवार, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मंदार जोशी, सुशील तरटे यांच्यासह मान्यवरांनी डॉक्टरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, मायणी येथे प्रतिनिधी मारुती पवार यांच्या उपस्थितीत ‘सत्य सह्याद्री’ने प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे डॉ. येळगावकर यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment