अनुप शहा यांच्या अपात्रतेला स्थगिती - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, June 7, 2019

अनुप शहा यांच्या अपात्रतेला स्थगिती

फलटण- फलटण नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अनुप रमणलाल शहा यांना अपात्र करण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी  दि 29 में रोजी  दिले होते.  त्यावर शहा यांनी पूर्णविलोकन अर्ज शासनाकडे दाखल केल्यावर आज राज्यमंत्री आदेशाला तातपुरती स्थगिति दिल्याने अनुप शहा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


नगर पालिकेतील लिपिकाला अनूप शहा यांनी  चप्पल काढून मारहाण केल्याचा प्रकार चौकशीत सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार अपात्र करण्याची कारवाई करण्यात आली.  29 मे 2019 रोजी नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची प्रत शनिवारी 1 जुनला जिल्हा प्रशासनाकडून फलटण नगरपालिकेला प्राप्त झाली.1965 च्या  42 नुसार शहा यांना अपात्र ठरविण्याची  कारवाई करण्यात आली . 4 ऑक्टोबर 2017 रोजी बांधकाम विभागाचे लिपिक कुंभार यांना कागदपत्रांची मागणी करूनही न दिल्याच्या रागातून शहा यांनी त्यांना चप्पल ने मारण्याचा ठपका होता. या प्रकरणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे  13  नोवेम्बर 2018 व  9 जानेवारी 2019 व  12 फेब्रुवारी2019 रोजी तीन वेळा सुनावणी झाली. शहा यांनी त्यांच्या खुलाशात या आरोपाचा इन्कार केला होता. मात्र तक्रारदाराने माडलेली बाजू, सादर झालेली कागदपत्रे व फलटण मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सादर केलेला अहवाल व दाखल  सीडी यांची सत्यता पडताळली असता शहा दोषी असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत नागरी अधिनियम 1965 चे कलम 42 (1) व कलम 42(4) शहा यांना अपात्र करण्याचे आदेश नगरविकास राज्य मंत्र्यांनी दिले होते यावर अनूप शहा यांनी शासनाकडे  अपात्रतेच्या आदेशाविरुद्ध पूर्णविलोकन अर्ज दाखल केला होता त्या अनुषंगाने 29 मे च्या आदेशास नगरविकास राज्यमंत्री यांनी अंमलबजावणी करण्यास तात्पुरती स्थगिति दिली आहे असे नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी प्रवीण पाटील यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.


अनूप शहा हे  नगरपालिकेतील  सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान स्वीकृत नगरसेवक असले तरी त्यांनी उघड़पने राष्ट्रवादीशी बंडखोरी केली आहे राष्ट्रवादीच्या विरोधात शहा खूपच आक्रमक भूमिका घेत असल्याने शहा यांना अपात्र ठरविले गेल्यावर राष्ट्रवादीच्या विशेषता राजेगटात  आनंदाचे वातावरण होते मात्र शहा यांनी खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यां माध्यमातून शासनाकडे दाद मागितल्यावर शासनाने स्थगिती आदेश दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. नगरपालिकेत एकामागोमाग एक धक्कयांची मालिका सुरु करणार असल्याचे संकेत शहा यांनी दिले असून भविष्यात सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक विरुद्ध अनूप शहा असा जोरदार सामना रगनार आहे अपात्रतेच्या आदेशास स्थगिति दिल्याबद्दल राज्य शासन आणि खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे शहा यांनी विशेष आभार मानले आहे.

No comments:

Post a Comment