
कुरिअरमधील १ कोटी ५५ लाखांचे सोने-चांदी हस्तगत; मालगावातील सात आणि शिवथरमधील एक अशा आठ संशयितांना अटक
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कवठे, ता. वाई : पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कुरिअर कंपनीच्या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर कवठे गावच्या हद्दीत अडवून कोयत्याचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा लुटणाऱ्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत छडा लावला. या प्रकरणी आठ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ कोटी ५५ लाख २७ हजार २५८ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी घडलेल्या या दरोड्याचा तपास वेगाने पूर्ण करत पोलिसांनी मोठी कारवाई केली.
तीन दुचाकींवरून पाठलाग; महामार्गावर वाहन अडवले
मार्क एक्सप्रेस कुरिअर कंपनीची महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ०९ एफएल ५४२३) ही १६ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. खेड शिवापूर टोलनाका आणि कापूरहोळ परिसरातून तीन दुचाकींवरून आलेल्या आठ जणांनी या वाहनाचा पाठलाग केला. कवठे गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आडवी घालून त्यांनी पिकअप थांबवली.
त्यानंतर चालकाला कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात आली. पिकअपचा मागील दरवाजा उघडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा असलेले पोते जबरदस्तीने घेऊन लुटारूंनी पलायन केले. या घटनेप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) आणि १२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कुरिअरमधील माहितीच्या आधारे आखला कट
दरोड्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अज्ञात आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली विविध तपास पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, विश्वसनीय बातमीदाराकडून मालगाव येथील काही संशयितांच्या हालचालींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेल्यांपैकी गोपीनाथ तानाजी कदम हा कराड येथे कुरिअर कंपनीत कामाला होता. त्यामुळे पुणे आणि कोल्हापूरदरम्यान कुरिअर वाहनाच्या येण्या-जाण्याच्या वेळा तसेच वाहनातील मालाची माहिती त्याला होती. त्याने ही माहिती मंगेश एकनाथ जाधव याला दिल्यानंतर अन्य साथीदारांच्या मदतीने दरोड्याचा कट आखण्यात आल्याचे तपासात समोर आले.
आठ जणांना अटक; संपूर्ण मुद्देमाल हस्तगत
या प्रकरणी गोपीनाथ तानाजी कदम, मंगेश एकनाथ जाधव, ऋतिक रमेश कदम, आदित्य हणमंत कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे, निखील दिलीप कदम, अक्षय शांताराम मोझर (सर्व रा. मालगाव, ता. जि. सातारा) आणि निषीध शरद साबळे (रा. शिवथर, ता. जि. सातारा) यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून दरोड्यात लुटलेले १ कोटी ५५ लाख २७ हजार २५८ रुपये क

0 Comments