मलकापूर नगरपरिषद करण्याची प्रक्रिया सुरू; 6 आठवड्यांचा अवधी : अशोकराव थोरात सत्ताधारी उपनगराध्यक्ष व त्यांचे नेते म्हणजे ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’! - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, July 30, 2018

मलकापूर नगरपरिषद करण्याची प्रक्रिया सुरू; 6 आठवड्यांचा अवधी : अशोकराव थोरात सत्ताधारी उपनगराध्यक्ष व त्यांचे नेते म्हणजे ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’!


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
मलकापूर : मलकापूर नगरपंचायतीची नगरपरिषद आजच झाली असे भासवत सत्ताधारी उपनगराध्यक्ष पार्टीने आज सोमवार दि. 30 जुलै 2018 रोजी सकाळी 10 पासूनच मिरवणूक काढलीगुलाल उधळलाउन्मादाने नाचलेत्याला सणसणीत चपराक बसलीकोणतेही चांगले काम सर्वांच्या सहकार्याने कायदेशीर मार्गाने पार पाडल्यावर पूर्ण होतेते पूर्ण होण्याआधीचकोर्टाचा निर्णय ऐकण्यापूर्वीच जर कोणी पेढे वाटायला लागलेनाचायला लागलेतर त्यांची गत अशीच होणार!
 परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही असे सांगितले होतेकी शासनाच्या वतीने नगरपरिषद करण्याचे निवेदन मान्यायालयात दिले जाईल त्याप्रमाणे ते दिले.नगरपरिषद दर्जा मिळविण्याची कार्यवाही राज्यशासनाकडून होत असून लवकरच त्याची घोषणा होईलमंगळवार दि. 24 जुलै 2018 रोजी डॉअतुल भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीत्यावेळी मामुख्यमंत्र्यांनी असे सांगितलेकी उच्च न्यायालयात योग्य ती पूर्तता करून प्रशासकीय पातळीवर नगरपरिषद होण्यासाठी अंमलबजावणी करू.
 मलकापूर नगरपंचायतीची नगरपरिषद होण्याबाबतची याचिका मामुंबई उच्च न्यायालयात होती व त्यावर आज सुनावणी होऊन महाराष्ट्र सरकारमा.मुख्यमंत्री व नगरविकास खात्याचे मंत्रीसचिव यांनी नगरपरिषद करत आहोतअशा आशयाचे निवेदन दिलेनगरविकास खात्याने आपला शब्द पाळून नगरपरिषद करण्याबाबतची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ मागून घेतला व उच्च न्यायालयाने त्यांना दीड महिन्याचा वेळ दिलायापुढे मानाअतुल भोसले यांनी स्वतलक्ष घालून शासकीय स्तरावरून सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण करून घेण्याचे ठरविले असूनते या कामासाठी मुंबईला मंत्रालयात जात आहेत.याचाच अर्थ मलकापूरची नगरपरिषद ही कायदेशीररित्या कोणासही त्रास न होताकोणाचेही हक्क हिरावून न घेता सर्वांच्या हितासाठी व्हावी यासाठी भाजपा,मामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नाडॉअतुल भोसले (बाबाया सर्वांचा प्रयत्न आहे.

सत्ताधारी उपनगराध्यक्ष व त्यांचे नेते म्हणजे ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’!      

मलकापूरचे सत्ताधारी उपनगराध्यक्ष व त्यांचे नेते हे ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ या म्हणीप्रमाणे आपला कार्यकाळ संपण्याच्या वेळेला घाई करत आहेत.आजच सकाळी 11 वाजलेपासून त्यांनी आम्ही नगरपरिषद केली अशा प्रकारच्या घोषणा देत गुलालाची उधळण करत गावभर मिरवणूक काढलीनागरिकांना त्रास दिलाबँजो लावून 5-50 मोटार सायकलींना झेंडे लावूनफटाक्यांच्या माळा लावून स्वत:ची पाठ स्वतथोपटून घेत होतेपण प्रत्यक्ष हायकोर्टाचा निकाल दुपारी 1.30 वाजता आला व प्रत्यक्ष नगरविकास खात्याने सादर केलेल्या म्हणण्याप्रमाणे 6 आठवड्यांची मुदत दिलीयाचाच अर्थ सत्ताधारी उपनगराध्यक्ष यांची पार्टी व त्यांचे चाहते तोंडावर पडून उताने पडलेअतिघाई व वेळेपूर्वीच उन्माद करणे बरे नाहीनगरपरिषद आपणा सर्वांनाच हवी आहेपण इतरांना श्रेय जाईल म्हणून आपल्या कोंबड्यांना रात्री 2 वाजता ओरडायला लावणे बरे नाही.
 मलकापूरआगाशिवनगरशास्त्रीनगरमधील नागरिकांनी नाडॉअतुल भोसले यांच्यावर विश्वास ठेऊन डॉभोसले हे आता मलकापूरचे आहेत व मलकापूर हीच त्यांची कार्यभूमी आहेत्यांचे मार्गदर्शनाखाली पुढील 5 वर्षात देदीप्यमान विकास होईलकोणावरही अन्याय होणार नाहीअखेर सत्याचाच विजय होत असतो.

No comments:

Post a Comment