पाटण तालुक्यात कडकडीत बंद, कराड - चिपळूण रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता रोको, जाळपोळ. - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, July 28, 2018

पाटण तालुक्यात कडकडीत बंद, कराड - चिपळूण रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता रोको, जाळपोळ.

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

पाटण / संजय कांबळे :  मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी नवी मुंबई (कोपरखैरणे) येथे झालेल्या आंदोलनात  सखल मराठा समाजाचा युवक रोहन तोडकर रा. खोणोली ता. पाटण या युवकाचा नाहक बळी गेला. रोहन तोडकर हा कामानिमित्त नवी मुंबई कोपरखैरण येथे होता. रोहन तोडकर याच्या बलिदानार्थ  पाटण तालुका सखल मराठा समाजाच्या वतीने तालुका बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर पाटण, चाफळ, मल्हारपेठ, नवारस्ता, दौलतनगर येथे कडकडीत बंद पाळला.  कराड - चिपळूण रोडवर अनेक ठिकाणी रस्ता रोको करून  आंदोलकांनी ठिय्या मांडला. यावेळी रोहन तोडकर अमर रहे, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच.. अशा घोषणा देऊन रोहन तोडकर या युवकास श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करून रोहन तोडकर याच्या कुटुंबास आर्थिक मदत करण्याचे मराठा समाजाने अहवान केले. या बंद काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 


संपुर्ण महाराष्ट्रभर सकल मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक २५  रोजी नवि मुंबई कोपरखैरणे येथे झालेल्या हिंसक आंदोलनात पाटण तालुक्यातील खोणोली येथील  रोहन तोडकर  या युवकाचा नाहक बळी गेला. शुक्रवार दि. २७  रोजी सकाळी आठ वाजता रोहनचा  मृतदेह  चाफळ येथे आल्यानंतर  मोठ्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांनी मृतदेहाची शववाहिका अडवून  रोहन यास शहिद घोषित करावा, कुटुंबाला तातडिची पन्रास लाखाची आर्थीक मदत मिळावी, मारेकऱ्यांना शोधुन फाशी देण्यात यावी तसेच कुटुंबातील सज्ञान व्यक्तीस शासकीय नोकरीस घ्यावे आदी मागण्यांकरत तसे लेखी आश्वासन प्रशासनाकडून मिळेपर्यंत रोहन चा मृतदेह रोखून धरला. यावेळी  जिल्हाभरातून जमलेला मराठा समाज संतप्त होत होता. तब्बल पाच तासानंतर घटनास्थळी जिल्हाअधिकारी श्वेता सिंंघल, जिल्हा पोलीस प्रमुुख संंदिप पाटील, आमदार शंभूूराज देसाई, मराठा क्रांती मोर्चाचे सातारा जिल्हा समन्वयक शरद काटकर, विक्रमबाबा पाटणकर  यांनी उपस्थीत जमाव व नातेवाईकाशी चर्चा करत तसे मागण्यांचे  लेखी आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या वतिने जिल्हाअधिकारी श्वेता सिंंघल यांनी दिल्यानंतर नातेेेवाईकांनी रोहनचा मृतदेेेह ताब्यात घेतला व त्याच्या  जन्मगावी खोनोली येथे नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी  मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुक्याच्या वतीने शनिवारी संपूर्ण तालुका बंदचे अहवान करण्यात आले. 


 या अहवानाला प्रतिसाद देत शनिवारी संपूर्ण पाटण तालुक्यात  उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. तर तारळे येथे आठवडी बाजार असल्याने बंद न पाळता रोहन तोडकर यास तेथील सर्व समाज बांधवांनी श्रद्धांजली वाहिली. पाटण शहरात सर्व व्यापारी  व्यवसायीक यांनी शांततेत उत्स्फूर्त बंद पाळून रोहन तोडकर यास श्रद्धांजली वाहिली. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, हर्षद कदम,  यशवंतराव जगताप, राजाभाऊ काळे, रविंद्र सोनावले, सुरेश पाटील, गोरख नारकर, दिपक शिंदे, संजय चव्हाण,  चंद्रकांत मोरे, अनिल भोसले, अजय कवडे, बकाजीराव निकम, राजेंद्र पाटणकर, समिर सय्यद, नितीन पिसाळ, गणेश मोरे, शंकर मोहिते, मंगेश पाटणकर, लक्ष्मण चव्हाण, वैभव पाटणकर, शिवाजीराव कोळेकर, आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


मल्हारपेठ निसरे फाटा येथे परिसरातील मराठा युवकानी एकत्र येऊन सकाळी ११ वा. सुमारास कराड - चिपळूण हा  मार्ग  दोन तास रोखून धरला. आणी मराठा आंदोलनात बळी गेलेल्या  रोहण तोडकर या युवकाला  श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या समाज कंठकांचा निषेध व्यक्त केला. या रस्तारोकोत आमदार शंभूराज देसाई, शंकर शेडगे, गुरूदेव शेडगे, अमोल माने, हणमंतराव माने, शशिकांत निकम, रवि पाटील, विजय शिंदे,  राघवेंद्र पाटील, मनोज पानस्कर, शिवाजी देसाई, यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाटणचे पोलिस निरिक्षक अशोक भापकर याना निवेदन देण्यात आले.


नवारस्ता या ठिकाणी काही  सकल मराठा समाजाच्या वतीने कराड - चिपळून ते  नवारस्ता - ढेबेवाडी मार्ग दोन ते अडीच तास रोखून धरण्यात आला .यामध्ये काही अंदोलकानी मार्गावरच टायर पेटवून दिल्याने काही काळ तणाव निर्मान झाला पोलिसानी तातडीने टायर विझवून मार्ग खुला केला. मराठाबांधवानी रस्तारोको वेळी शासनाने मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलकानी दिला. आंदोलन शांततेच्या मार्गाने होण्यासाठी विजय पवार, विष्णू पवार, दिनकर माथणे, धनंजय केंढे, नितीन सत्रे, रामराव कदम, वैभव पवार, मनोज शिर्के यांनी प्रयत्न केले. यावेळी चाफळ खोनॊली येथील मृत रोहन तोडकर यास श्रध्दांजली वाहण्यात आली. नवारस्ता निसरे फाटा मल्हारपेठ येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करणेत आला होता.


No comments:

Post a Comment