रोहन तोडकरच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी, लेखी आश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, July 27, 2018

रोहन तोडकरच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी, लेखी आश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात


संजय कांबळे/ दिलीप चव्हाण
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
चाफळ : नवी मुंबई येथे झालेल्या मराठा समाजाच्या मोर्चावेळी सकल मराठा समाजाचा खोनोली ता. पाटण येथील रोहन तोडकर वय १८ या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता त्याला त्याच्या गावी आणल्यानंतर नातेवाईक व नागरिकांनी रोहनच्या शरीरावर काठ्या व धारधार शस्त्राचे वार असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे सांगत मृतदेह ताब्यात घ्यायला विरोध दाखवला व तब्बल पाच तास चाफळ या ठिकाणी नातेवाईकांच्या मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोवर मृतदेह हातात न घेण्याचा पवित्रा दाखवल्यामुळे चाफळ परिसरातील वातावरण तंग झाले होते अखेर आमदार शंभूराज देसाई , जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या मध्यस्थीने लेखी मागण्या नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी कि,रोहन तोडकर हा युवक आपल्या आत्याकडे कोपरखैरणे या ठिकाणी कामानिमित्त राहत होता. मुळचा खोनोली या गावचा असणाऱ्या रोहनची घरची परस्थिती एकदम बिकट असून वडील व आई हे शेती व्यवसाय करतात. एका बहिणीच्या लग्नानंतर भाऊ व घरात कर्ते कोणी नसल्याने कुतुबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर पडली होती.गेल्या बुधवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चात तो सहभागी झाला होता.त्यावेळी पोलिसांनी लाटीचार्ज केल्याने तो जखमी झाला होता आणि त्याच्यावर उपचार सुरु होते असे सांगून त्याचा मृतदेह पोलिसांनी रोहनच्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन खोनोली या गावी पाठवून दिला मात्र नातेवाईकांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या शरीरावर धारधार शस्त्राने अनेक वार केले असल्याचे लक्षात आल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.व चाफळ ता.पाटण याठिकाणी कमानी जवळ जोवर प्रमुख चार मागण्या समोर ठेवल्या व लेखी आश्वासन मागितले पहिली मागणी  रोहनचा खून झाल्याबाबतचा खरा गुन्हा नोंद करा, त्याला शहीद घोषित केले जावे, त्याच्या कुटुंबाला ५० लाखाची तातडीची मदत केली जावी, घरातील एक व्यक्ती शासकीय सेवेत घ्यावी या प्रमुख मागण्या मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक शरद काटकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दिल्या व त्यांच्याकडून लेखी आश्वसन घेतल्या नंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

यावेळी आमदार शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाचा स्वतः पाठपुरावा करणार असून जो कोणी या मध्ये दोषी असेल त्याला कठोर शिक्षा होई पर्यंत तसेच रोहन याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी झालेली घटना हि दुर्दैवी असून या घटनेचा संपूर्ण तपास करण्यासाठी तसेच रोहन याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सर्वांनी शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी जमावाला शांत करण्यासाठी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता व छावणीचे स्वरूप आले होते.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शरद काटकर म्हणाले कि , मराठा क्रांती मोर्चाला गाल बोट लावण्यासाठी मराठा समाजाव्यतिरिक्त समाजकंठ्क मोर्चात घुसले व त्यांनी मोर्चा मध्ये दगड फेक केली. तसेच शासनाने मराठा समाजाच्या शांत निघालेल्या ५८ मोर्चा नंतर आरक्षणाचा निर्णय घेतला असता तर मोर्चा वेळी गेलेले निष्पाप बांधवांचे जीव वाचले असते. रोहन हा गरीब कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून त्याच्यावर केलेले वार पाहून हा घातपाताचा प्रकार असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. यामध्ये जो कोणी अपराधी आहे त्याला चौकशी करून शिक्षा झाली पाहिजे तसेच त्याच्या कुटुंबाला ५० लाखाची मदत तातडीने देण्यात यावी हि आमची मागणी आहे.

रोहनचा मृतदेह घेण्या अगोदर प्रशासनाच्या वतीने कोणी येत नाही हे पहिल्यावर चाफळ बस स्थानकात टायर पेटवून तसेच माजगाव येथील पूलावर टायर पेटवून या गोष्टीची नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच रस्त्यावर लाकूड टाकून रस्ता रोको करण्यात आला होता. दिवसभर चाफळ व परिसरातील दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.यावेळी बस सेवा व खाजगी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ व रोहित यास श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुका यांनी तालुका बंदचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment