शासकीय गाङीचे पूजन करुन सरकारकडे आरक्षणाची मागणी, फलटण मध्ये मराठा क्रांती मोर्चाचे अनोखे आंदोलन - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 1, 2018

शासकीय गाङीचे पूजन करुन सरकारकडे आरक्षणाची मागणी, फलटण मध्ये मराठा क्रांती मोर्चाचे अनोखे आंदोलन

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

विक्रम चोरमले /फलटण  - फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अनोखे आंदोलन करत तालुक्याचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यांचे शासकीय वाहन पूजन करून सरकारला मराठा आरक्षण देण्याची सद्बुद्धी देण्याची प्रार्थना करण्यात आली. अशा वेगळ्या आंदोलनातून मराठा आरक्षणाची मागणी या भाजपा सरकार पर्यंत पोहोचवून आम्हाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे अशी मागणी फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली.



गेली सतरा महिने मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिला नसल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब होत असल्याचे विधान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सांगत आहेत या मुळे हे राज्य सरकारने पहिल्यांदा जाहीर करावे की मागासवर्गीय आयोग काय पाकिस्तानचे काम करीत आहेत का? ते ही आपलेच महाराष्ट्र मधील आहेत या मुळे या राज्य सरकाने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मराठा समाजाला गोल गोल बोलून व मागासवर्गीय आयोगाचे गाजर दाखवून फसवणूक बंद करावी महाराष्ट्र भर 58 मोर्चे काढून देशासह जगात इतिहास निर्माण केला आहे. सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आहे तर फलटण तालुका हा छ. शिवाजी महाराज यांची सासुरवाडी व मराठ्यांचा योद्धा छ. संभाजी महाराजांचे आजोळ असणारा तालुका आहे इथं जर या सरकार बाबत चीड निर्माण झाल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार विरोधात मराठा समाजातील युवक जर रस्त्यावर उतरला तर या सरकारला खूप महागात पडेल.



भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार मराठा समाजाच्या भावना दुखावत असून संयम सुटल्यास तुमच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरून देणार नाहीत त्यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे मराठा समाजाचा अंत पाहू नये संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असताना फलटण येथे अनोखे आंदोलन केले जात असताना ही मुख्यमंत्री यांनी आरक्षणासाठी येणाऱ्या दोन दिवसात निर्णय घ्यावा असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या सहा दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन येथील अधिकार गृहासमोर सुरू असून या ठिय्या आंदोलनात फलटण तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने अनोखे पध्दतीने व शांततेच्या मार्गाने सुरू असून या शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा मोर्चा ठोक मोर्चामध्ये मराठा समाज वळल्यास या भाजपा सरकारला व स्वतः मुख्यमंत्री असलेल्या गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना ठोक आंदोलन परवडणारे नसेल असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या युवकांच्या वतीने शासनाला देण्यात आला.

No comments:

Post a Comment