पत्रकारास आरोपीची वागणूक - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, August 4, 2018

पत्रकारास आरोपीची वागणूक






सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
उंब्रज : उंब्रज ता कराड येथे एसटी बस मध्ये घडलेल्या घटनेच्या वार्तांकन साठी फोटो काढत असताना उंब्रज पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी अर्वाच्च भाषा वापरुन पत्रकारास आरोपीची वागणूक दिली. तसेच या पत्रकाराचे ओळख पत्र काढून घेतले. उंब्रज पोलीसांच्या या मुजोरी पणाचा प्रतेय आजवर अनेकांना आला आहे. पंरतू लोकशाही चा चौथा आधार स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारावरच घाला घातल्याने संपूर्ण जिल्ह्य़ातून निषेध व्यक्त होत असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
शनिवार दि. ४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उंब्रज पोलीस ठाण्या समोर ही घटना घडली. याबाबतची माहिती अशी की, काशीळ ता. सातारा येथील पत्रकार विकास जाधव हे शनिवारी दुपारी उंब्रज हून काशीळ कडे त्यांच्या दूचाकी वरून प्रवास करत होते. उंब्रज पोलीस ठाण्याजवळ आल्या नंतर तेथे एसटी बस उभी असल्याचे व प्रवाशांची तपासणी सुरु असल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकाराची त्यांनी शहानिशा केली असता त्यांना सदर एसटी बस मधील एका प्रवाशी पर्स चोरीस गेल्याने बस पोलीस ठाण्यात आणून सर्व प्रवासी यांची झडती सुरु असल्याचे समजून आले. या गंभीर घटनेचे वार्तांकन करण्याच्या उद्देशाने विकास जाधव यांनी त्यांच्या मोबाईलवरून फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. प्रवाशी यांच्या तपासणीचे फोटो घेत असताना उंब्रज पोलीस ठाण्याचे हवालदार रविंद्र पवार व वाहतूक पोलीस कर्मचारी शहाजी पाटील यांनी मूळ तपासणी सोडून पत्रकार विकास जाधव यांनाच फोटो काढण्याच्या कारणांवरून अरेरावीची भाषा वापरत जाधव यांना पोलीस ठाण्यात नेऊन आरोपी सारखी वागणूक दिली .
 मी पत्रकार आहे असे म्हणत विकास जाधव यांनी ओळख पत्र दाखवले परंतु मुजोर पोलिस कर्मचारयांनी त्यांचे ओळखपत्र काढून घेतले. त्यानंतर प्रभारी अधिकारी यांच्या समोर उभे करून ओळख पत्र परत दिले. दरम्यान कायद्याच्या रक्षकांकडून लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभात जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकारास पोलीसांकडून अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. तसेच संबंधितावर वरीष्ठांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
फोटो :- हाच तो फोटो ज्यामुळे पोलीसांनी पत्रकाराला दिली आरोपीची वागणुक

No comments:

Post a Comment