फलटण शहर व तालुक्यात, वाईत कडकडीत बंद - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, August 9, 2018

फलटण शहर व तालुक्यात, वाईत कडकडीत बंद



मराठा आरक्षणासाठी आज राज्यभरात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.  आज फलटण शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला सकाळपासून व्यापार, विक्रेते, व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवसाय बंद ठेवत मराठा आरक्षणाच्या बंदला पाठिंबा दिला.
        मराठा समाज आरक्षणासाठी आज पूर्ण महाराष्टात बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आल्याने तालुक्यातील सर्व व्यवहार आज पूर्ण बंद होते एकही दूकान चालु नव्हते मराठा समाजातील अनेक युवक मोटार सायकल रैलीद्वार शहरातून फिरूंन एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची पूजा करून मराठा आंदोलनात शहीद झालेल्या सर्वाना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सयोजकांच्या वतीने उपस्थितना शांततेत आंदोलन करण्याची शपथ देण्यात आली त्यानंतर  छात्रपतींच्या पूतळया समोरील चौकात काही वेळ शातंतेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
  बंदच्या पार्षभुमिवर शाळा, महाविद्यालयांनीही सुट्टी जाहीर केली होती. सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवाही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे फलटण मध्यवर्ती बसस्थानकात शुकशुकाट जाणवत होता. आजच्या बंदच्या प्राश्वभुमीवर पोलिस प्रशासनाने शहर व ग्रामीण भागात पोलिस बंदोबस्त ठेवुन  कायदा व सुव्यवस्था न बिघडण्याची खबरदारी घेतली. तालुक्यातील पेट्रोलपंप, शाळा, कॉलेजेस व जिवनावश्यक वस्तूंच्या विक्री करणारी दुकाने बंद  असल्यामुळे अनेकांची मात्र गैरसोय झाली .सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला.
 फलटण पूर्व भागातील गोखळी आसू खटकेवस्ती  राजाळे साठे  येथे कडकडीत बंद
मराठा आरक्षणासह इतर मागण्यासाठी आयोजित महाराष्ट्र बंदला फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी आसू खटकेवस्ती राजाळे साठे पवारवाडी जाधववाडी हणमंतवाडी, गुणवरे आदी भागात ठिकठिकाणी कडकडीत बंद बंदला मोठा प्रतिसाद प्राथमिक माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर काॅलेज, सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने मराठा क्रांती मोर्चा आयोजित महाराष्ट्र बंदला पाठींबा देऊन बंद मध्ये सहभागी घेतला.
वाईत मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार
वाई : सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात विविध जिल्हयात शांततापुर्ण व शिस्तबदद् आपल्या विविध मागण्यासांठी मराठा क्रांती भव्य मोर्चे काढून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. तरी ही शासन पातळीवर कोणत्याही प्रकारची ठोस दखल घेतली जात नसल्याचे पाहून मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी बुधवार  दि. 9 ऑगस्ट सकाळी आकरा वाजता वाई तालुक्यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव वाई मध्ये एकत्र येवून संपूर्ण वाई शहरातून घोषणा देत काढण्यात आली.शिवाजी चौकातून मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मोटर सायकल रॅलीचा प्रारंभ केला. महारॅली शिवाजी चौकातून वाई एसटी स्टॅण्ड , सिध्दनाथवाडी, महागणपती पुलावरून, शाहिरचौक गंगापूरी, भाजी मंडई वाई नगरपालिका, रविवारपेठ, जामामशीद यंगरविवारचौकातून किसनवीर चौक, सोनगिरवाडी, बावधननाकावरून प्रातंकार्यालयात प्रातांधिकारी अस्मिता मोरे यांना निवेदन देवून शिवाजी चौकात ठियया् अंदोलनाच्या ठिकाणी समारोप करण्यात येवून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव ठियया् अंदोलन ठिकाणी एकत्र झाले. यानतंर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जम्मू कश्मीर येथील शहीद झालेले वीर मेजर कौस्तुभ राणे  व मराठा अंदोजनात राज्यभरातून आरक्षण व इतर मागण्यासाठी बलिदान दिलेल्या 26  मराठा बांधवांना सर्वांनी दोन मिनिट उभे राहून श्रध्दांजली वाहीली.  समाजातील युवक, अबाल वृध्द, महिला यांनी बावधन नाका चौकात भर रस्त्यात ठियया् मारून अंदोलनाची धार तीव्र केली. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या वतीने मान्यवरांनी आपले विचार प्रकट करून शासनाला जाग येण्यासाठी गोंधळ घालण्यात आला. अंदोलन स्थळी आमदार मकरंद पाटील यांनी भेट देवून पांठीबा दिला. अंदोलन आकरा वाजता सूरू होवून दुपारी तीन पर्यंत ठियया् अंदोलनाची सांगता करण्यात आली. दुपारी तीन नतंर वाईच्या महागणपती घाटावर कृष्णानदीत उतरून आरक्षणासाठी नदीत उतरून शासनाच्या विरोधात जलअंदोलन केले.  वाई पोलिस स्टेशनच्या वतीने उपविभागिय पोलिस निरिक्षक  पोलिस निरिक्षक, उपनिरिक्षक, चाळीस पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांच्या माध्यमातून चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
दरम्यान वाई तालुक्यातील सर्व गावातून शंभर टक्के बंद पाळून  गांवामधून मराठा अंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी गावांच्या वेशीवर ग्रामस्थांनी एकत्र येवून घोषणाबाजी करून निषेध केला व वाईच्या महारॅलीमध्ये सामिल झाले. यामध्ये मांढरदेव, बावधन, ओझर्डे, पसरणी, मेणवली, धोम, शेंजूरजणे, कवठे, केंजळ यामध्ये रास्ता रोको करण्यात येवून चक्काजाम करण्यात आला. 
 अंदोलनातील मराठा बांधवांच्या मागण्या :- ठियया् अंदोलनात अंदोलकांनी शासनाच्या बोटचेप्या धोरणाविरोधात प्ररखड विचार प्रकट केले. व आपल्या मागण्या मांडल्या मध्ये मराठा आरक्षण जाहिर करावे, अंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या अंदोलकाच्या वारसास पन्नास लाख रूपये व एक वारसास शासकीय नोकरीत घ्यावे, बिंदू नामावलीतील दुरूस्ती करावी, सेवा जेष्ठतेप्रमाणे अधिकारी पदोन्नती देताना मराठा कर्मचा-यांना डावलण्यात येवू नये, विद्यार्थ्यांना 50 टक्के फि सवलत लागू करावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजातिल आठ लाख पेक्षा कमी उत्पन्न असणा-यांना लाभ दयावा, जिल्हानिहाय मराठा मुंलाना वस्तीगृह करावे अशा मागण्या मराठी बांधवांनी बोलताना शासनाकडे मागीतल्या. 

No comments:

Post a Comment