मालोजीराव देशमुखांना तहसीलदारांची नोटीस, वाळूचा ट्रक सोडलाचा कसा, खुलासा करा - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 12, 2018

मालोजीराव देशमुखांना तहसीलदारांची नोटीस, वाळूचा ट्रक सोडलाचा कसा, खुलासा करा



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दहिवडी: दोन महिन्यांपूर्वी कारवाई करून जप्त करण्यात आलेला वाळूचा ट्रक म्हसवड पोलिसांनी तहसीलदारांच्या आदेशाने सोडून दिला. परंतु, तहसीलदारांचा आदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात दैनिक सत्य सह्याद्रीने ट्रक सोडण्याचे गौडबंगाल काय? या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याप्रकरणी माणच्या तहसीलदार जयश्री आव्हाड यांनी  म्हसवडचे पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना नोटीस बजावत लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
दैनिक सत्य सह्याद्रीमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख नोटीस बजावली.
म्हसवडच्या तलाठ्यांनी 16 जुन 9095 क्रमांक असलेला व 4 ब्रास वाळुने भरलेला ट्रक जठरेवस्ती - देवापुर रस्त्यावर विरकरवाडी चौकाजवळ  पकडला होता. मात्र, तो ट्रक मालकांने तहसीलदारांचा आदेश असल्याने सोडून दिल्याचे सांगितले होते. मात्र, दैनिक सत्य सह्याद्रीने याबाबतची वस्तुस्थिती मांडत तो आदेश बनावट असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.  सदर ट्रक म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये 16 जुन रोजी तलाठ्यांनी जमा केला होता.  ज्या आदेशाने पोलीसांनी ट्रक सोडला तो आदेश पूर्णपणे बनावट असुन त्यापुर्वी एका अधिकृतपणे सोडलेल्या ट्रकच्या आदेशाची कॉपी केल्याचे दिसून येत असून हा बनावट आदेश महसूल ने ? की पोलीसांनी की ट्रक मालकाने बनवला याबाबत गूढ आहे.  आता देशमुखांना  24 तासात समक्ष खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
तालुक्यात वाळू तस्करांचे थैमान
माण तालुक्यात वाळू तस्करांनी धैमान घातले आहे.  यापुर्वीही असे अनेक ट्रॅक्टर व ट्रक सोडून दिल्याची खुलेआम चर्चा असून दोन दिवसांपुर्वी म्हसवड चावडीतुन एक ट्रॅक्टर चोरीला गेला होता. शिवाय माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी सातार्‍यातील पत्रकार परिषदेत म्हसवड पोलीस ठाण्याला दर महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता पोहोचत असल्याचा व प्रांताधिकारी कांबळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.  शिवाय जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे दोन्ही अधिकारी यात लक्ष घालणार का? असा सवाल आहेे. 

No comments:

Post a Comment