तात्यासाहेब दिवशीकर यांचे निधन - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, February 22, 2019

तात्यासाहेब दिवशीकर यांचे निधन

 
 
 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण - पाटण  तालुक्याचे ज्येष्ठ नेते व दिवशी  बुद्रुक गावचे सुपुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद  पवार यांचे  कट्टर समर्थक, व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे ज्येष्ठ राजकीय माग़दशक,  लक्ष्मण बहिरू सुर्यवंशी तथा  तात्यासाहेब दिवशीकर यांचे वयाच्या ९3 व्या वर्षी वृद्धापकाळाने  मल्हारपेठ येथील राहत्या घरी  आज सायंकाळी  निधन झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जाव ई, नातवंडे असा परिवार आहे, 
लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे त्या काळातील कॉंग्रेसचे निष्ठावंत, पुढे बाळासाहेबांच्या निधनानंतर मा. विक्रमसिंह पाटणकर दादांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून दादांना आमदार करण्यासाठी सिंहाचा वाटा होता  पाटण अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व सध्या ज््य्येष्ठ मााााागदशक  होते तात्यांचे शरद पवार साहेबांशी थेट सबंध होते, आयुष्यात कुठलाही राजकीय स्वार्थ न पाहता पवार साहेबांशी एकनिष्ठ राहून विक्रमसिंह पाटणकर दादांच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचले, त्यांंच्या निधनाने पाटण   तालुक्यावर शोककळा पसरली असून   तालुक्याच्या राजकिय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे,

No comments:

Post a Comment