संजय झंवरसह 10 जणांवर गुन्हा - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, May 27, 2019

संजय झंवरसह 10 जणांवर गुन्हा




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
.....................................
कोरेगाव :  कोरेगावचे माजी सभापती संजय झंवर, नगरसेवक संजय पिसाळ आदी बड्या नेत्यांसह 10 जणांविरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात बेकायदा वाळू उपशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली असून एकूण 61 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अटक आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यामुळे कोरेगाव शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
राजू रतनसिंग जाधव (वय 23) रा. मळ, मधुबाई तांडा, ता. जि. विजापूर (कर्नाटक), सध्या रा. हनुमाननगर, करण भारत फडतरे (वय 27), अजय बबन फडतरे (वय 40) दोघे रा. हनुमाननगर, कोरेगाव, इंद्रजीत बजिरंग जाधव (वय 22) रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव, सुधीर बळवंत बर्गे (वय 27), रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव, दीपक विष्णू डेरे (वय 47), रा. हनुमाननगर, कोरेगाव, रोहन भारत फडतरे (वय27) रा. हनुमाननगर, कोरेगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर आरोपींशिवाय झंवर, मोहन बाळासाहेब शिंदे, का. कळकाई गल्ली कोरेगाव, संजय लक्ष्मण पिसाळ (वय 52), रा. शांतीननगर कोरेगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन बालकाचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
कोरेगाव गावच्या हद्दीत मळवी नावाच्या शिवारात वसना नदीच्या पात्रात सुधीर बळवंत बर्गे यांच्या जागेमध्ये सोमवारी सकाळी अटक आरोपी झंवर,शिंदे यांच्या सांगण्यावरून वाळू उपशाचा परवाना नसताना चोरटी वाळू विक्री करीत होते.
त्यांच्याकडून एक जेसीबी, एक महिंद्रा पिक अप, फॉर्च्युनर, हिरो माईस्ट्रो दुचाकी, हिरो दुचाकी, एक स्प्लेंडर दुचाकी, हिरो होंडा स्ट्रीट दुचाकी, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, युनिफोन कंपनीचा मोबाईल, रेडमी कंपनीचा मोबाईल, विवो कंपनीचा मोबाईल, नोकिया कंपनीचा मोबाईल, तांबो कंपनीचा मोबाईल असा 61 लाख 77 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
पोलीस हवालदार मधुकर बसवंत (वय 49) यांनी फिर्याद दिली.

No comments:

Post a Comment