उरमोडीच्या पाण्यासाठी दिवडमध्ये रस्तारोको - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, May 27, 2019

उरमोडीच्या पाण्यासाठी दिवडमध्ये रस्तारोको


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड

उरमोडीचे पाणी दिवड गावाला सोडण्याच्या मागणीसाठी दिवड ग्रामस्थांनी सोमवारी दिवड बस स्टॉपसमोर  सुमारे तासभर  रस्तारोके आंदोलन केले. या आंदोलनामुळे सातारा-पंढरपूर रस्त्यावर लांबच्या लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्याना उरमोडी प्रक्लपाचे अभियंता पवार यांनी येत्या दहा जुन पर्यंत उरमोडीचे पाणी सोडण्याचे आश्वासन देवून आंदोलन सोडण्यात आले
उरमोडीचे पाणी दिवडला सोडण्या संदर्भात 15 मे रोजी कार्यकारी अभियंता उरमोडी , जिल्हाधिकारी सातारा, प्रांताधिकारी , तहसीलदार माण कृष्णा खोरे सिंचन विभाग व म्हसवड पोलिस स्टेशन यांना निवेदन देवून येत्या 27 मे पर्यंत उरमोडीचे पाणी दिवडला न सोडल्यास रस्तारोकोचा इशारा देण्यात आला होता.  उरमोडी प्रक्लपाचे अभियंता पवार साहेब यांनी आंदोलनस्थळी येवून येत्या 10 जुन पर्यंत उरमोडीचे पाणी दिवडला सोडण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी बालेखान सय्यद, सयाजी लोंखडे, आण्णासाहेब काटकर सत्यवान सावंत, नवनाथ लोखंडे, धनाजी सावंत, शफीक सय्यद, रामचंद्र सावंत, तुकाराम सावंत, यशवंत सावंत, तानाजी भोसले, बबन काटकर आदी दिवडचे ग्रामस्थ  उपस्थित होते. यावेळी सपोनि मालोजीराव देशमुख यांनी आंदोलकांशी समन्वय साधून वाहतुक तातडीने सुरु व्हावी यासाठी अभियंता पवार यांना बोलवून घेतले.

No comments:

Post a Comment