प्राधिकरणाची पाणीबिले चक्क नाल्यात - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, May 26, 2019

प्राधिकरणाची पाणीबिले चक्क नाल्यात



 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
........................................
सातारा :  सातारा परिसरात केल्या जाणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याची बिले आसनगाव रस्त्यावरील एका नाल्यात आढळून आली आहेत. यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांनी केला असून प्रधिकरणाकडे त्यांनी निवेदनाद्वारे याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबत त्यांच्या निवेदनातील माहिती अशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत पाणी बिले माहे डिसेंबर 2018  ते मार्च 2019 या कालावधीतील बिले मौजे शेरेवाडी येथील शिलोबचा डोंगरा च्या पायथ्याशी आसनगाव रोडवरील  नाला( ओघळ ) मध्ये हजारो पाणी बिले टाकण्यात आलेली आढळून आली. सदर बिलांची वाटण्याची व भरण्याची अंतिम तारीख 30-5-2019 अशी असल्याचे निदर्शनात आले. ही बिले चार महिन्यांची असल्याचे बिलावरील देयक महिन्यावर दिसून येत आहे.
शासनाचे दोन महिन्याचे बिले काढण्याचे आदेश असताना मनमानीपणे काढल्याचे दिसून येत आहे. यामुळे चार महिन्याचे एकत्रित बील आले मुळे निवृत्त तसेच सातारावासियांना बिले भरताना अडथळे येत आहे.
अशाप्रकारे यापूर्वी हा प्रकार घडला आहे का याची चौकशी करण्यात यावी.
 बिले मुदतीत न वाटता सदरची बिले नाल्यामध्ये आढळून आल्याने गैर कारभार केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांच्याकडे हि बिले पोहोचले जात नाहीत त्यामुळे पुन्हा बील आल्यास ज्यादाचा अधिभार लाऊन दर आकारला जातो.  बिले वेळेत वाटप न झाल्या मुळे ग्राहकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोषाची भावना असून या कडे प्राधिकरणा कडून दुर्लक्ष होत आहे. प्रस्तुत बिले संबधीतांनी बिले जाळण्याचा प्रयत्न सुद्धा केला असल्याचे प्रत्यक्षस्थळी दिसून येत आहे. हा ग्राहकांवरील झालेला अन्याय दूर करण्यात यावा. प्रस्तुत बिले बेळेत वाटण्यात यावी. बिले वाटप करणार्‍या यंत्रणेवर कोणत्याही प्रकारे अंकुश ठेवलेला नाही. यामुळे वरील बाबीस जबाबदार असणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

No comments:

Post a Comment