विधानसभेसाठी माणला येळगावकरांना पसंती - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, June 10, 2019

विधानसभेसाठी माणला येळगावकरांना पसंती




जयराम शिंदे
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
.....................................................
दहिवडी : माण - तालुक्यातून सध्याच्या राजकीय परस्थीतीमध्ये खूप मोठा बदल होताना दिसत आहे. पाठीमागची दहा वर्षे आणि भविष्याचा अभ्यास केला तर परिस्थितीमधे खूप मोठा फरक पडेल, असे वातावरण आहे. सध्या तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत माढा मतदार संघ चर्चेत आहे. कारण हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच मतदार संघातून शरद पवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. नंतर विजयसिंह मोहीते पाटील. परंतु, दहा वर्षे लोकांच्या आशेच्या निराशा झाल्या. कोणतेही आश्वासन पूर्ण झाले नाही.
गेली चाळीस वर्षे माण - खटाव तालुक्यातील लोकांनी राष्ट्रवादी पक्षाला भरभरून सहकार्य केले. एवढी सत्ता भोगून सत्ताधारी लोकांच्या प्राथमिक  गरजाही सोडवू शकले नाहीत. परिवर्तन फक्त लोकांना आश्वासनातून एकायला मिळाले. म्हणूनच  यावेळी  मतपरिवर्तनाच्या माध्यमातून माढा मतदार संघामधून  रणजितसिंह निंबाळकर  मताधिक्याने निवडून आले.
चाळीस वर्षे केवळ दिशाभूल
गेली चाळीस वर्षे पाणी या मुद्यावर येथील लोकांची मोठी दिशाभूल झाल्याने लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आणि कायमस्वरूपी पाणी आपल्याला मिळेल या विश्वासाने केंद्रात ही आपल्या मतदारसंघाचा प्रतिनिधी आसावा या उद्देशाने आणी रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून आपल्याला नक्की पाणी मिळेल या विश्वासाने मतदान केले.  यासाठी भारतीय जनता पर्टीचे सर्व पदाधिकार्‍यांबरोबरच माजी आमदार आमदार डॉ. दिलीप येळगावकर, आनिल देसाई यांनी कमळ फुलवण्यासाठी तर भविष्यातील पाणी प्रश्नासाठी माणवासियांनी भरभरून मतदान केले.
येळगावकरांवरील विश्‍वास वाढतोय
अलीकडच्या पाच वर्षात माण मतदारसंघात माजी आमदार डॉ. येळगावकर यांच्या कामावरील विश्वास वाढला आहे.  राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच डॉ. येळगावकर यांनी पाणी प्रश्‍नाचा विषय घेऊन तो मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यांच्या आमदारकीच्या काळात उरमोडीसाठी 168 कोटी 98 लाख  व जिहेकठापुरसाठी 91 कोटी 76 लाख  एवढा निधी मिळवला आणि माण - खटावच्या जनतेचा चेहरा आनंदाने भरून गेला.
आजपर्यंत डॉक्टर आमदार आसते तर कदाचित माण-खटाव सुजलाम सुफलाम झाला असता, अशी जनभावना आहे.  त्यांनी  त्यांच्या आमदारकीच्या काळात उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविण्यात आले. विधान सभेत सर्वात जास्त प्रश्न  विचारणारे फक्त येळगावकरच होते.
माण खटावचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी 25 वर्षे  संघर्ष न्याय देताना दिसत आहेत. जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर येळगावकरांएवढा अभ्यास कोणाचाच नाही.
याच अभ्यासातून जिहे कठपूरची योजना मांडली. योजना मांडुन थांबले नाहीत तर  मंत्रालय, विधानसभा, कृष्णा खोरे, लोकसभेच्या पायर्या झिजावल्या मंत्र्यांना नेत्यांना या योजनेचे मुद्दे पटवून दिले. यातूनच जिहेकठापुर योजनेचा जन्म झाला. येत्या काही दिवसात माण -खटावमध्ये पाणी खळखळनार आसा विश्वास येथिल लोकांना वाटत आहे.
डॉक्टरांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच टेंभू, उरमोडीचे पाणी सध्या खटाव -माण मध्ये खळखळत आहे. माणमधील 16 गावे आणि मायणी परिसरातील टेंभू येजनेतुन  पाणी देण्याच्या निर्णयाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.टेंडर निघून लवकरच पाणी मायणी तलावात येईल. गेल्या पाच वर्षामध्ये सर्व सामान्य जनतेस मोदी सरकारच्या काळात  चालू झालेल्या योजना मिळवून देण्यास डॉक्टरांनी चांगले सहकार्य केले आहे.
सर्वसामान्य लोकांच्या प्रश्‍नाची जानीव आसणारे आणि आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पाणी प्रश्नावरील अभ्यास आणि प्रमाणीक नेतृत्व  कर्यकर्तांना विश्वासात घेऊन  काम करण्याची पद्धत  आणी आजपर्यंतचा आभ्यास विधानसभेतील,मंत्रालयातील आनुभव आणी केंद्रातील मोदी सरकार यांचा सर्व फायदा माण -खटावच्या विकासासाठी आणि परिवर्तनासाठी  होईल.
यासाठी भारतीय जनाता पर्टीचे स्थानिक कर्यकर्ते आणी सर्व सामान्य जनतेकडून  डॉ. येळगावकर यांच्या नावाची विधानसभेसाठी चर्चा होत आहे. तालुक्यातील वातावरण पाहता डॉ येळगावकर यांना याचा फायदा होईल, असे जुन्या जाणकारांबरोबरच युवा वर्गाचेही मत आहे.

No comments:

Post a Comment