‘स्वीकृत’चा चेंडू चंद्रकांत पाटलांच्या कोर्टात - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, June 24, 2019

‘स्वीकृत’चा चेंडू चंद्रकांत पाटलांच्या कोर्टात



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
...............................................
सातारा : सातारा नगरपालिकेच्या भाजपच्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवड थेट चंद्रकांत दादा पाटील करणार असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. प्रत्येकी पाच बूथची जवाबदारी जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांवर देऊन मतदानाचा टक्का कसे वाढेल याची रणनीती आखण्यात आली. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष विकम पावसकर, शेखर वढणे, भाजपचे गटनेते मिलिंद काकडे, धनंजय जांभळे, विजय काटवटे, सिध्दी पवार, प्राची शहाणे, अ‍ॅड प्रशांत खामकर उपस्थित होते.
शेखर वढणे यांनी बैठकीत बूथानिहाय आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बैठकीला संबोधित करत विधानसभा निवडणुकांच्या तयारीत बूथ बांधणीचे महत्व सांगून प्रत्येकी पाच बूथ सदस्यांनी वाटून घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ज्या बूथवर वीस पेक्षा कमी मतदान झाले त्या बूथला ए प्लस मध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना आहेत.
महिला आघाडी मोर्चाला सुध्दा प्रत्येक बूथमधून किमान पंचवीस राख्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. याशिवाय बूथ व विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ता मेळावे व शकती गट प्रमुखांच्या बैठका येत्या जुलै महिन्यात होणार असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले . तसेच वीस पेक्षा कमी मतदान झालेले 550 बूथवर विशेषत्वाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला .स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. निष्ठावंताना भाजप स्वीकृत नगरसेवक पदावर वर्णी लागली पाहिजे अशी जोरदार मागणी पुढे आली. स्वीकृत साठी जे पदाधिकारी इच्छुक आहेत त्यांनी आपले अर्ज जिल्हा कार्यकारिणीकडे दयावेत त्यावर प्रदेश कार्यकारिणी जो निर्णय देईल व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील जे नाव अंतिम करतील त्याची निवड करण्याचा निर्णय मान्य करण्यात आला.
राजघराण्यातील मनोमिलनाचा कच्चा धागा तुटल्यानंतर सातारा नगरपालिकेत ‘साविआ’, ‘नविआ’ असे दोन गट तयार केले. त्यामध्ये संधी हुकल्याने काहींनी भाजप प्रवेश करून पालिकेत कमळ पुन्हा उमलविले. नगरसेवक विजय काटवटे, मिलींद काकडे,धनंजय जांभळे, प्राची शहाणे, सिध्दी पवार या सहा जणांनी पालिकेत प्रवेश केला. त्यामुळे  स्वीकृत नगरसेवकपदाचा दावेदार ठरलेल्या भाजपने पहिल्या टप्प्यात अ‍ॅड. खामकर आणि दुसर्‍या वेळी सागर पावशे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही अशी टीका होऊ लागली. त्यामुळे यावेळी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे असा आग्रह धरला जात आहे. तेव्हा पासून सातारा शहर भाजप अंतर्गत कलहाला सुरवात झाली आहे.          
 सातारा नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर  भाजपमधून शहर अध्यक्ष सुनिल कोळेकर, धीरज घाडगे, महेंद्र कदम, अप्पा कोरे,, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, अशी इच्छुकांची  यादी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तयार केली आहे . मात्र याचा अंतिम निर्णय चंद्रकांत पाटीलच निर्णय घेणार आहेत .
स्वीकृत नगरसेवक नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आज महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत निष्ठावंत वादापेक्षा बूथ बांधणीचा काथ्याकूट झाला. भाजप पक्ष अडचणीत असताना उर्जितावस्था आणण्याचे काम प्रामाणिकपणे ज्यांनी केले त्यांनाच  स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी द्यावी असा सूर निष्ठावंतामध्ये आहे.
विधानसभेसाठी तयारी व इच्छुकांच्या उड्या  
सातार्‍यात भाजपची तयारी सुरू झाली तरी पारंपारिक युतीच्या संकेतात काही जागा शिवसेनेकडे आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जी बांधणी भाजपची दिसली ती सेनेची दिसली नाही. मात्र, जिल्हयात सेना व भाजप या दोहोनी राजकीय दृष्टया कंबर कसल्याने वादाची भांडी वाजणार हे नक्की त्यामुळे वरिष्ठ पातळीवर कशी समीकरणे घडणार त्यावर जिल्हयात युतीची रणनीती अवलंबून राहणार आहे. सध्या तरी भाजपच्या तंबूत स्वीकृत वरून बर्‍याच जणांच्या उड्या पडायला सुरवात झाली आहे. त्यामध्ये तत्कालिन भाजपशहराध्यक्ष सुनिल कोेळेकर आघाडीवर होते. आक्रमक आंदोलने केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

No comments:

Post a Comment