नीरा उजवा कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, June 25, 2019

नीरा उजवा कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
...................................................
फलटण : नीरा देवघरचे पाणी येथील बागायती पट्ट्यात कधी व किती मिळणार याबाबतच्या लेखी मागणीला अधीक्षक अभियंता अमोल निकम यांनी आठ दिवसांत ही माहिती देण्याचे आश्वासन शेतकर्‍यांना दिले होते. मात्र, आठ दिवस उलटूनही ही माहिती न दिल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपकक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी थेट नीरा उपविभागीय कार्यालयात धडक दिली. तिथे अभियंता निकम नसल्याने आमदार चव्हाण संतप्त झाले.
या वेळी  शेतकर्‍यांनी कार्यालयात ठिय्या मांडत ‘हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे’च्या  जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या वेळी कर्मचारी झिरपे यांनी निकम यांचेशी चर्चा करून गुरुवारी 27 जून पर्यंत लेखी माहिती देऊ असे आश्वासन दिले.
नीरा देवघर चे पाणी नीरा डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर ला दिलेले पाणी बंद करण्यात आले आहे, असे सांगून ते पाणी नीरा उजवा कालव्यात मिळणार आहे, असे पत्र शासनाने दिले. यामुळे फलटण तालुक्यातील बागायती पट्ट्यातील 36 गावातील लोकांनी  रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पाणी वापर संस्थेच्या चेअरमन व सचिवांनी तसेच लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी हे पाणी आम्हाला वाढवून मिळणार आहे का? मिळणार ते किती मिळणार या बाबत लेखी खुलासा पाटबंधारे विभागाचे अभियंता अमोल निकम यांना बुधवार दि.12 जून रोजी मागितला होता. यावेळी  निकम यांनी सर्व लेखी माहिती आठ दिवसात देतो, असे सांगितले होते मात्र आठ दिवस होऊन गेले तरी काहीही माहिती न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, व आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दि.24 रोजी सकाळी नीरा उजवा विभागाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला.
अचानक आलेल्या या मोर्चामुळे  उपस्थित  अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली तेथील एका कर्मचार्‍याने अमोल निकम यांना दूरध्वनी करून ही माहिती दिली या वेळी त्यांना आ. दिपक चव्हाण यांनी चांगलेच खडसावले. यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर, डी. के. पवार, विलासराव नलावडे, धनंजय पवार यांच्यासह शेतकरी व तरुण कार्यकर्ते  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment